लक्ष्मण तुरेराव ।लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : बाजार समितीत लाल मिरचीची आवक झाली नसली तरीही येथील औद्योगिक वसाहतीतील व्यापारी तेलगंणा, आंध्र प्रदेशमधून मिरचीची आवक करत आहेत़ येथील बाजार समितीत लाल मिरचीची आवक थंडावली असली तरीही औद्योगिक वसाहतीत मात्र लाल मिरची चांगलीच भडकली आहे.गेल्यावर्षीपेक्षा यंदा तीन ते चार हजार रुपये भावाने लाल मिरचीत वाढ झाली आहे. तेलगंणा, आंध्र प्रदेश या राज्यांतून धर्माबाद औद्योगिक वसाहतीतील बाजारपेठत तिखट लाल मिरचीची आयात मोठ्या प्रमाणात होत आहे.महाराष्ट्र- तेलंगणा राज्य सीमेवर धर्माबाद बाजारपेठ असल्याने दोन्हीही राज्यांचा संबंध येतो. हैदराबाद, वरगंल, गुंठूर व तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून टू सेवन थ्री, सी फायु, आर एल, तेजा, गुंठुर या नावाची मिरची धर्माबाद औद्योगिक वसाहतीत आयात केली जात आहे. धर्माबाद बाजारपेठेत आणखी लाल मिरचीची आवक झाली नाही. येथील व्यापारी तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून आठ ते अकरा हजार रूपये प्रतिक्विंटलने मिरची आणत आहेत़ या मिरचीचे देठ काढण्यासाठी महिलांना धर्माबाद औद्योगिक वसाहतीत चांगला रोजगार मिळत आहे. एक महिला दिवसभर ४० ते ५० किलो मिरचीचे देठ काढते. देठ काढण्यासाठी प्रतिकिलो आठ ते दहा रुपये दिले जातात. त्यातून एका महिलेला दिवसभरात ४०० ते ५०० रूपये मिळत आहेत़ याच मिरचीचे, मिरची कांडप (कारखाना) मधून पावडर करून ही मिरचीपावडर परत तेलगंणा, आंध्र प्रदेशमध्ये निर्यात होते. तेलंगणा, आंध्र प्रदेश व नांदेड जिल्हा व मराठवाड्यातून नागरिक येथील तिखट मिरची पावडर घेऊन जातात. धर्माबाद शहरातील रत्नाळी, बाळापूर, फुलेनगर, मौलालीनगर, शास्त्रीनगर, रामनगर, रमाईनगर, साठेनगर व ग्रामीणमधून रामपूर, आल्लूर, आतकूर, येताळा आदी भागातून महिला देठ काढण्यासाठी येतात. शंकरगंज येथील कृष्णा राईस मिलचे व्यापारी मुरलीधर सत्यनारायण झंवर हे तेलगंणा, आंध्र प्रदेश राज्यातून लाल मिरचीची आवक करीत असून त्यांच्या औद्योगिक वसाहतीत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. पूर्वी झीरोमध्ये माल आयात होत होता. आता जीएसटीमुळे नंबर एकमध्ये माल येतो. व्हेबील चांगला येत आहे. जीएसटी चांगली आहे असे मत व्यापारी रूपम संपतकुमार झंवर यांनी सांगितले. धर्माबादची मिरची मराठवाड्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या बाजारपेठेतील लाल मिरची मुंबई, दिल्ली, कोलकात्ता, नाशिक, अकोला, नागपूर व इतर राज्यात निर्यात होते; पण यावर्षी अद्याप बाजारपेठेत खरेदीस सुरूवात झाली नसल्याची माहिती बाजार समितीकडून माहिती मिळाली.देशभरात लाल मिरचीची निर्यात४ या बाजारपेठेतील लाल मिरची मुंबई, दिल्ली, कोलकाता, नाशिक, अकोला, नागपूर व इतर राज्यांत निर्यात होते; पण यावर्षी बाजारपेठेत खरेदीस अद्याप सुरूवात झाली नसल्याची माहिती बाजार समितीकडून मिळाली.४धर्माबाद बाजारपेठ महाराष्ट्र- तेलगंणा राज्य सीमेवर असल्याने दोन्हीही राज्यांचा संबंध येतो. हैदराबाद, वरगंल, गुंठूर व तेलगंणा, आंध्र प्रदेश राज्यातून टू सेवन थ्री, सी फायु,आर एल, तेजा, गुंठुर या नावाची मिरची धर्माबाद औद्योगिक वसाहतीत आयात केली जात आहे.
धर्माबादेत लाल मिरची भडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:14 IST
बाजार समितीत लाल मिरचीची आवक झाली नसली तरीही येथील औद्योगिक वसाहतीतील व्यापारी तेलगंणा, आंध्र प्रदेशमधून मिरचीची आवक करत आहेत़ येथील बाजार समितीत लाल मिरचीची आवक थंडावली असली तरीही औद्योगिक वसाहतीत मात्र लाल मिरची चांगलीच भडकली आहे.
धर्माबादेत लाल मिरची भडकली
ठळक मुद्देबाजार समितीत मिरची थंडावली : तेलंगणा, आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक