शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा परिषदेत बदल्यांची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:13 IST

प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया मागील काही वर्षांपासून ई-पोर्टल पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा जिल्हा प्रशासनाने कर्मचा-यांच्या बदलीप्रक्रियेतही हाच समुपदेशनाचा मार्ग अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून या प्रक्रियेला ५ मे पासून प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्देई-पोर्टल : शिक्षकांप्रमाणेच कर्मचाऱ्यांसाठीही आता समुपदेशनाचा अवलंब

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया मागील काही वर्षांपासून ई-पोर्टल पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा जिल्हा प्रशासनाने कर्मचा-यांच्या बदलीप्रक्रियेतही हाच समुपदेशनाचा मार्ग अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून या प्रक्रियेला ५ मे पासून प्रारंभ होणार आहे.प्राथमिक शिक्षक वगळता जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ व गट ‘ड’ कर्मचाºयांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला जिल्हा परिषदेत सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या माध्यमातून सार्वत्रिक बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी समुपदेशनाचे वेळापत्रकही तयार केल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सांगितले.जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षक वगळता शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महिला बालकल्याण, अभियांत्रिकी, ग्रामीण पाणीपुरवठा, सामान्य प्रशासनासह विविध विभागाच्या गट ‘क’ व गट ‘ड’ कर्मचाºयांच्या बदल्यांचा या प्रक्रियेमध्ये समावेश आहे.बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी मागील काही वर्षांपासून ई-पोर्टलद्वारे समुपदेशन पद्धत अवलंबिली जाते. हीच पद्धत यावर्षी मुख्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ क्लार्क, अधीक्षक, कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, सेवक-सेविका, सहाय्यक-सहाय्यिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत विभागातील ग्रामसेवक, शिक्षण विभागातील माध्यमिक शिक्षक, कृषी विभागातील कृषी सहाय्यक यांच्यासह वर्ग-३ कर्मचाºयांचा यामध्ये समावेश असणार आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांना बदल्यांसाठी कराव्या लागणाºया कसरतींना ब्रेक लागणार असून यातून होणारी उलाढालही थांबणार आहे़समुपदेशनासाठी असे आहे वेळापत्रकशनिवार ५ मे २०१८ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत-बांधकाम विभाग. सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत-लघूपाटबंधारे विभाग, दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत- ग्रामीण पाणीपुरवठा विभाग. दुपारी १ ते २ वाजेपर्यंत-कृषी विभाग. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत- पशुसंवर्धन विभाग. दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत - महिला व बालकल्याण विभाग.दुपारी ४ ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- सामान्य प्रशासन विभाग. रविवारी ६ मे २०१८ रोजी सकाळी ९ ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- आरोग्य विभाग. बुधवार ९ मे २०१८ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत- अर्थ विभाग. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत- शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विभाग. दुपारी २ ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत. ग्रामपंचायत विभाग. या सर्व समुपदेशनाचे ठिकाण कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड हे राहील.

टॅग्स :Nanded zpनांदेड जिल्हा परिषदTeacherशिक्षक