शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

१ जून रोजी खरेदी केंद्र बंद होणार; यंदा खरेदीविना कापूस पडून राहण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:53 IST

यावर्षी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये  खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र हे केंद्र विविध कारणामुळे तीन वेळा   बंद पडले. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळत गेली.

ठळक मुद्दे२४०० शेतकऱ्यांचा कापूस प्रतिक्षेत मागील तीन दिवसात ९५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी 

- गोकुळ भवरे

किनवट (जि. नांदेड) : किनवट तालुक्यातील चिखलीफाटा येथील कापूस खरेदी केंद्र  १ जून रोजी बंद होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील तीन दिवसात या केंद्रावर ९५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. अद्याप २ हजार ४०१ शेतकऱ्यांचा नोंदणी केलेला कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्यामुळे उरलेल्या दहा ते बारा दिवसात या कापसाची खरेदी प्रक्रिया कशी पार पडणार असा प्रश्न उपस्थित होत असून, यंदा मोठ्या प्रमाणात कापूस  तोलाईविना पडून राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

किनवट तालुक्यातील कापूस हे नगदी व मुख्य पीक असल्याने शेतकरी कापूस वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यावर्षी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये  खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र हे केंद्र विविध कारणामुळे तीन वेळा   बंद पडले. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळत गेली. सध्या तिसऱ्यांदा कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रावर मागील तीन दिवसात नोंदणी झालेल्या २ हजार ४९६ शेतकऱ्यांपैकी ९५ शेतकऱ्यांचा २ हजार ४५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.  सीसीआयने तिसऱ्यांदा कापूस खरेदी सुरू केली मात्र अधूनमधून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने खरेदी प्रक्रिया खोळंबत असल्याचे   कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवि तिरमनवार यांनी सांगितले.

तीन दिवसांत ९५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झालेला असल्याने उर्वरीत बारा दिवसात साधारणपणे पाचशे शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होऊ शकते. असे झाल्यास उर्वरीत साधारण १ हजार ९०० शेतकऱ्यांचा कापूस  घरातच पडून राहण्याची शक्यता  असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियातर्फे सुरु असलेली किनवट येथील कापूस खरेदी बंद झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कापूस एकतर तेलंगणातील आदीलाबाद येथे नेऊन विकावा लागेल. सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर कापूस पाठविणे अवघड आहे. त्यातच तेथे काय भाव मिळेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे स्थानिक खासगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने माल देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आढावू शकते.  या सर्व प्रकारामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

प्रति क्विंटल दोन हजार रुपये मदतीची मागणीपावसाळ्यात कापूस खरेदी होणार नसल्याने उर्वरीत हजारो क्विंटल कापूस यंदा खरेदीविना पडून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या पण कापूस खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने  प्रति क्विंटल दोन हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.

लॉकडाऊनमुळे मिळेनात कुशल मजूरएम. एच. कॉटेज जिनिंग प्रेसिंगमध्ये सध्या कापूस खरेदी सुरु आहे. मात्र लॉकडाऊनमुळे या ठिकाणी कुशल मजूर उपलब्ध झालेला नाही. पर्यायाने स्थानिक मजुरांकडून काम केले जात आहे. त्यामुळेही खरेदी प्रकिया संथपणे सुरु आहे.  तांत्रिक मजूर उपलब्ध नसल्याने चार दिवसांत चार मोटर जळाल्या असल्याचे जिनिंग प्रेसिंगचे व्यवस्थापक कल्हाळे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेड