शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोयीचा अहवाल देण्यासाठी लाच मागणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:51 IST

नांदेड : नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या एका चौकशी प्र्रकरणात सोयीचा अहवाल सादर करण्यासाठी ३० हजार ...

ठळक मुद्देतक्रारदाराचा यू टर्न : सदर पोलिसाचा संबंध नसल्याचे निवेदन

नांदेड : नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या एका चौकशी प्र्रकरणात सोयीचा अहवाल सादर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ जानेवारी रोजी आलेल्या एका तक्रारीत सोयीचा अहवाल सादर करण्यासाठी पोलीस शिपाई वैजनाथ पाटील हे ५० हजार रुपयांची लाच मागत असल्याचे म्हटले होते. तर या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारदाराविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात एका प्रकरणात चौकशी सुरु होती. या चौकशीत अहवाल सोयीचा सादर करण्यासाठी वैजनाथ पाटील याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. पाटील याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे १६ जानेवारी रोजी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय लाठकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजय डोंगरे, पोलीस कर्मचारी शेख चांद, साजेद अली, पोकॉ अंकुश गाडेकर, सुरेश पांचाळ, शिवहार किडे यांनी रचला. दरम्यान, या प्रकरणात खुद्द तक्रारदारानेच संबधीत पोलीस कर्मचाºयाचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे पत्र एसीबीला दिले आहे. तकरदाराच्या चौकशीचा अहवाल हा २ जानेवरीलाच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात होता. तर तक्रार ३ जानेवारीला देण्यात आली होती.विशेष म्हणजे एसीबीकडे तक्रार देताना ती तक्रारदाराच्या हस्ताक्षरात असायला पाहिजे. परंतु या प्रकरणात महिलेची केवळ स्वाक्षरी घेण्यात आली, याचाही महिलेने उल्लेख केला आहे.या प्रकरणात निरपराध कर्मचाऱ्याला गुंतविण्यात आले असून, त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गौडबंगाल कळायला मार्ग नाही.पंचासमक्ष गुन्हा झाला सिद्ध-डोंगरेसदर प्रकरणात तक्रारदाराने कर्मचाऱ्याचा संबंध नसल्याचे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिले आहे. मात्र तक्रारदाराच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात पोलीस शिपाई वैजनाथ पुंडलिक पाटील याने ३० हजार रुपये लाच मागितल्याची बाब पंचासमक्ष सिद्ध झाली होती. या सर्व सापळ्याचे छायाचित्रीकरणही झाले असल्याचे पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी