शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आॅनर किलिंग प्रकरणात आज शिक्षेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:54 IST

भोकर : तालुक्यातील थेरबन येथील विवाहितेने प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग मनात धरुन भावानेच दोघांचाही गळा कापून निर्घृण खून केल्याच्या ...

ठळक मुद्देदोघांचा केला होता खून भावानेच चिरला होता बहिणीसह तिच्या प्रियकराचा गळा

भोकर : तालुक्यातील थेरबन येथील विवाहितेने प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग मनात धरुन भावानेच दोघांचाही गळा कापून निर्घृण खून केल्याच्या प्रकरणाचा गुन्हा भोकर जिल्हा सत्र न्यायालयात सिद्ध झाला असून गुरुवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत न्या. एम. एस. शेख यांनी शिक्षेचा निकाल राखून ठेवला आहे.तालुक्यात दोन वर्षांपूूर्वी दुहेरी खुनाने खळबळ उडाली होती. थेरबन येथील वेगवेगळ्या जातीतील पूजा दासरे - वर्षेवार (वय २२) व गोविंद कराळे (२५) यांचे प्रेम जुळल्यानंतर समाजात बदनामी होईल, म्हणून घरच्यांनी पूजाचा विवाह भोकर येथील जेठीबा वर्षेवार यांच्यासोबत १० जून २०१७ रोजी केला होता. परंतु गावातीलच गोविंदसोबत प्रेमसंबंध असल्याने पूजाने सासर सोडून प्रियकरास गाठले. याचा अपमान सहन न झालेल्या पूजाचा भाऊ दिगंबर दासरे त्याने आपल्या चुलतभाऊ मोहन दासरे यास सोबत घेऊन बहीण व तिचा प्रियकर यांचा तालुक्यातील दिवशी शिवारात २३ जुलै २०१७ रोजी विळ्याने गळा चिरला होता. दिगंबर दासरे स्वत:हून ठाण्यात हजर झाला.याबाबत भोकर पोलिसांत आरोपी दिगंबर व मोहनविरुद्ध ३०२, ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद होता. तत्कालीन पो.उपनि. सुशील चव्हाण यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात ८ साक्षीदार तपासण्यात आले.दया दाखवून कमीत कमी शिक्षेची केली विनंतीगुन्हा सिद्ध झाल्याचे न्या. ए.एस. शेख यांनी बुधवारी झालेल्या अंतिम तपासणीत सुनावले. आरोपींना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. रमेश राजूरकर यांनी आॅनर किलिंग असल्याने मृत्यूदंडाची विनंती केली तर आरोपीचे वकील मोहन जाधव यांनी आरोपींचे वय, वृद्ध माता- पिता, कुटुंबात कर्ता व्यक्ती असल्याने दया दाखवून कमीत-कमी शिक्षेची विनंती केली आहे. तरी न्यायालय कोणती शिक्षा सुनावते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निकालाचे गांभीर्य लक्षात घेवून न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :NandedनांदेडHonor Killingऑनर किलिंगCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय