शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देगलूर - ग्रामपंचायत निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण बुधवारी गोविंद माधव मंगल कार्यालयात घेण्यात येत आहे. प्रशिक्षणात १३७८ ...

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

देगलूर - ग्रामपंचायत निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण बुधवारी गोविंद माधव मंगल कार्यालयात घेण्यात येत आहे. प्रशिक्षणात १३७८ कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या १४१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

घोडके माहूरला रूजू

माहूर - येथील तहसील कार्यालयातील रिक्त पदावर नायब तहसीलदार म्हणून के.एस.घोडके रूजू झाले आहेत. नायब तहसीलदारांची दोन पदे रिक्त होती. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. त्यातील एक पद भरण्यात आले असून घोडके यांची नियुक्ती झाली आहे. दुसरे पद कधी भरल्या जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अवैध दारू जप्त

कंधार - उस्माननगर पोलिसांनी लाडका येथे ३० डिसेंबर रोजी छापा मारून अवैध मार्गाने विकली जाणारी दारू पकडली. याशिवाय चारचाकी वाहनही जप्त केले. पोलिसांनी देशी दारूचे ३० बॉक्स तसेच बोलेरो गाडी जप्त केली. एकूण ६ लाख ७४ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. श्यामसुंदर जाधव (रा.धानोरा) याच्याविरूद्ध या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे, जमादार मस्के, पो.ना.मुंडे, पो.कॉ.जाकुलवार, जीपचालक कदम यांनी आरोपीला पकडले.

५१ कर्मचारी गैरहजर

उमरी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षणास ५१ कर्मचारी गैरहजर आढळले. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. यामध्ये ९ मतदान केंद्राधिकारी, ४२ मतदान अधिकारी आदींचा समावेश आहे. प्रशिक्षणास उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार बोथीकर, नायब तहसीलदार राजेश लांडगे, शंकर नरावाड आदी उपस्थित होते.

किरण शिंदे हिचा सत्कार

लोहा - जि.प. प्राथमिक शाळा सुनेगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील पहिली शिक्षक मित्र किरण शिंदे हिचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती अंबलवाड, केंद्रप्रमुख डी.आर.शिंदे, मुख्याध्यापक एल.एन.पंदेवाड, काशीनाथ शीरसीकर, प्रतीभा कुलकर्णी, मुर्तुजा सय्यद आदी उपस्थित होते.

पाईपलाईनचा शुभारंभ

नायगाव - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन नळयोजनेच्या पाईपलाईनचा शुभारंभ गजानन नगर येथे नगराध्यक्ष शरद भालेराव, गुरुनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, गटनेते सुधाकर शिंदे, गुरुनाथ शिंदे, नंदा देसाई, प्रा.हरीबाबु, साहेबराव गम्पलवार, शिवाजी खंडगावकर, नारायण कदम, मंडळ अधिकारी पवळे, गोवर्धन जाधव आदी उपस्थित होते.

ऑटो उलटून दोघे जखमी

हिमायतनगर - भोकरहून इस्लापूरला जाणारा ॲपे ऑटो पोटा बु. बसस्थानकापासून काही अंतरावर उलटला. यामध्ये दोघे गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी दुपारी घडली. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. संदीप घाडगे (वय ३२, रा.थेरबन), विमलबाई नामलवाड (वय ४५) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर साईनाथ तांदळवाड असे अन्य जखमीचे नाव आहे.

अंकुशकर यांचा सत्कार

मुखेड - पोलीस उपाधीक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल मुखेडचे नरसिंग अंकुशकर यांचा येवती येथील नराशाम महाराज संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य वसू पाटील, बाळू जोशी, जमादार पांडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

हदगाव - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण २ जानेवारी रोजी पार पडले. प्रशिक्षणास १४८७ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आदेशित केले होते. त्यातील १४१९ हजर होते. ३७ गैरहजर राहिले. यावेळी तहसीलदार जीवराज डापकर, नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी, जी.डी. हराळे, बी.एन.जाधव, पोलीस निरीक्षक गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले.