शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आली दिवाळी; गुजरात, तेलंगणाच्या पणत्या नांदेडच्या बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 19:15 IST

कोजागिरी पौर्णिमेपासून बाजारपेठ बहरण्यास सुरूवात झाली आहे. 

ठळक मुद्देगतवषर्षीच्या तुलनेत २० टक्के भावात वाढकोरोनामुळे पणती व्यवसायावर झाला परिणाम

नांदेड : कोजागिरीचा चंद्र दुधात पाहून झाला की, हळूच गारव्याची चाहूल लागते. रात्रीच्यावेळी चंद्रप्रकाशाने न्हावून निघालेल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची उधळण मनाला प्रसन्न करून जाते. अशा उत्साही वातावरणात दिवाळीच्या आगमनाची तयारी सुरू होते. बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपोत्सवाची लगबग बाजारपेठेत सुरू झाली असून यंदा  गुजरात, आंध्र, तेलंगणा या राज्यातील पणत्यांचे नांदेडच्या बाजारात आगमन झाले आहे. गतवर्षीच्या भावात यंदा  २० टक्के भाववाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

यावर्षीची दिवाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी हाेत आहे. मागील सात- आठ  महिन्यांपासून बंद असलेली व्यापारपेठ हळूहळू सुरू झाली आहे. आर्थिक संकटाचा सामना करीत नागरिकांनी कोरोनाशी लढा दिला आहे. मागील सर्वच सणोत्सव साजरे करण्यापासून लोकांना वंचित रहावे लागले. मात्र, आता कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे तोंडावर आलेला दिवाळीचा सण नवा उत्साह घेवून आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण होत आहे. मागील सात महिन्यांपासून बंद असलेला व्यापार वाढत आहे. त्यातच कोजागिरी पौर्णिमेपासून बाजारपेठ बहरण्यास सुरूवात झाली आहे. दिवाळी म्हणजे, लक्ष लक्ष दिव्यांचा सण. त्यासाठी नांदेडच्या बाजारपेठेत आकाशकंदिल व पणत्यांचे आगमन झाले आहे. गुुजरात, आंध्र, तेलंगणा या राज्यांसह सोलापूर व इतर शहरांतून पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. विक्रेत्यांनी वर्कशॉप, श्रीनगर, तरोडानाका, जुनामोंढा, आदी  ठिकाणी पणत्यांची दुकाने थाटली आहेत. 

कोरोनामुळे पणती व्यवसायावर झाला परिणामकोजागिरीपासून पणत्यांची दुकाने शहरात लावले असून मोठ्या पणत्या ६० रूपये डझन तर लहान पणत्या  ४० रूपये डझन याप्रमाणे विक्री करण्यात येत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के भाववाढ झाली असल्याचे पणती विक्रेते रूपेश कुमार यांनी सांगितले. तर कोरोनामुळे आमच्या व्यवसायावर  मोठा परिणाम झाला  असल्याचे कुंभार समाजाच्या विक्रेत्यांनी सांगितले. 

टॅग्स :DiwaliदिवाळीNandedनांदेड