शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मनाठ्यातील व्यापारी गाळे अद्यापही कुलूपबंद अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:59 IST

मनाठा ग्रामपंचायत हद्दीतील १० व्यापारी गाळ्यांना दुरुस्तीचे काम करण्याचे निमित्त करून व्यापाऱ्यांना बाहेर काढले़ गाळे अद्यापही न मिळाल्याने व्यापारी हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देनव्याने केलेल्या कामांचे क्युरिंगही नाहीग्रामपंचायतकडून गाळे ताब्यात देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप

हदगाव : मनाठा ग्रामपंचायत हद्दीतील १० व्यापारी गाळ्यांना दुरुस्तीचे काम करण्याचे निमित्त करून व्यापाऱ्यांना बाहेर काढले़ गाळे अद्यापही न मिळाल्याने व्यापारी हतबल झाले आहेत.मनाठा येथे ग्रामपंचायतच्या सदस्यांना कामे वाटून देण्यात आली. कोणाला नाली बांधकाम, कोणाला पाण्याची टाकी बांधकाम तर काहींना अंगणवाडी तर काहींना सिमेंट रस्ता, तर सरपंच व एका सदस्याने घेतले व्यापारी गाळे दुरुस्तीचे काम. गाळे दुरुस्ती करून देतो म्हणून गाळ्यात बस्तान मांडलेल्या व्यापाºयांना बाहेर काढले़ काम पूर्ण होवून आठवडा उलटला, पण व्यापा-यांच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ केली जात आहे़याविषयी गंगाराम ठाकूर, विजय वाठोरे, किशनराव वाठोरे, सदानंद सोनाळे या व्यापाºयांनी सरपंच बाईची भेट घेतली व गाळे ताब्यात देण्याची विनंती केली़ परंतु त्यांना सन २०१६-१७-१८ या आर्थिक वर्षाचा किराया ५०० रुपये प्रतिमहा द्यावा, असे सांगण्यात आले़ पूर्वी २५० रुपये प्रतिमहा भाडे होते, तसा करारही असताना अचानक न सांगता भाडे वाढविण्याचे कारण काय? असा प्रश्न व्यापाºयांना पडला़ परंतु मागील थकबाकीतील निम्मी अनामत व एक वर्षाचा पूर्ण भाडे दिल्याशिवाय (थकबाकी) जमा केल्याशिवाय ग्रामपंचायत गाळ्याचे कुलूप काढणार नसल्याचे सरपंच दिशा नरवाडे यांनी व्यापा-यांना सांगितले़

  • व्यापारी गाळ्याचे छत गळत असल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात आली़ व्यापारी गाळ्यातील आतील भागाचा गिलावा, फर्शी बदलण्यात आली़ परंतु या कामावर पाणी टाकणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे़
  • दुरुस्तीच्या कामाचे निमित्त करुन मनाठा ग्रामपंचायतने १० व्यापा-यांना गाळे रिकामे करण्यास भाग पाडले
  • नियोजित वेळ उलटूनही गाळे ताब्यात न मिळाल्याने व्यापारी झाले हतबल
  • पूर्वीचे गाळेभाडे प्रतिमाह २५० रुपये असताना ग्रामपंचायत ५०० रुपये प्रतिमाह भाडे मागत असल्याने व्यापारी सापडले अडचणीत
  • निम्मी अनामत व एक वर्षांचे पूर्ण भाडे दिल्याशिवाय गाळ्यांचे कुलूप न उघडण्याचा ग्रामपंचायतचा निर्णय
टॅग्स :Nandedनांदेडbusinessव्यवसाय