त्रिरत्न नगर भागात घरफाेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:22 AM2021-08-28T04:22:46+5:302021-08-28T04:22:46+5:30

देगलूर, वजिराबादेतून दुचाकी लांबविली देगलूर आणि वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्याने दोन दुचाकी लंपास केल्या. चिंतलवार हॉस्पिटल देगलूर येथे ...

Burglary in Triratna Nagar area | त्रिरत्न नगर भागात घरफाेडी

त्रिरत्न नगर भागात घरफाेडी

Next

देगलूर, वजिराबादेतून दुचाकी लांबविली

देगलूर आणि वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्याने दोन दुचाकी लंपास केल्या. चिंतलवार हॉस्पिटल देगलूर येथे मजूर सायबू गंगाराम सूर्यवंशी यांनी तर महावीर चौक हनुमान मंदिर येथे पुष्पलता दत्तात्रय दंडेवाड यांनी आपली दुचाकी उभी केली होती. चोरट्यांनी या दोन्ही दुचाकी लंपास केल्या.

बसमध्ये चढताना मोबाईल उडविला

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येथे नांदेड-नागपूर बसमध्ये चढत असलेल्या एका तरुणीच्या पाठीवरील बॅगमध्ये असलेला सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. ही घटना २५ ऑगस्ट राेजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात वैष्णवी रमेशराव कदम यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

शनि मंदिराच्या पाठीमागे जुगार

भोकर शहरातील शनि मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. यावेळी येथे मटका सुरू होता. पोलिसांनी ११०० रुपये जप्त केले असून या प्रकरणात भोकर ठाण्यात गुन्हा नोंद केला.

Web Title: Burglary in Triratna Nagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.