लंपास केल्याची घटना २९ मे ते १ जून दरम्यान घडली. याप्रकरणी विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल केला
आहे.
लक्ष्मीनगर येथील योगेश सूर्यकांत जाणगेवाड हे २९ मे रोजी घरास कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.
चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले
सोन्या-चांदीचे दागिने, दोन कॅमेरा असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. योगेश जाणगेवाड हे
गावाहून परत आले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विमानतळ ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.
शहरात दुचाकी चोरीच्या दोन घटना
नांदेड - शहरात बिरसामुंडानगर येथून चोरट्यांनी दादाराव चोखोबा दुधमल यांची एम.एच.२६-एजे ३३७
क्रमांकाची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शिवाजीनगरातील अश्विनी हॉस्पिटलजवळ घरासमोर शुभम लालचंद चौधरी यांनी उभी केलेली एम.एच.२६
-ए-२०१६ क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. चौधरी यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा
दाखल केला आहे.
जुन्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण
नांदेड - जुन्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीस कुऱ्हाडीने मारुन गंभीर दुखापत केल्याची घटना मुखेड
तालुक्यातील नंदगाव (प.क.) येथे १ जून रोजी घडली. याप्रकरणी मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुखेड तालुक्यातील भिंगोली (भेंडेगाव) येथील तुकाराम गणपतराव जाधव (वय ४०) हे नंदगाव (प.क.) येथे
कामानिमित्त गेले होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.
या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. जाधव
यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.