शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांचा बैठकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:32 IST

पंचायत समिती सभापतीसह सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी नांदेड पंचायत समितीच्या मासिक सभेवर सभापतीसह इतर सदस्यांनी बहिष्कार टाकला. अधिकारासाठी सभेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ठळक मुद्देपूर्वीप्रमाणे अधिकार देण्याची मागणी

नांदेड : पंचायत समिती सभापतीसह सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी नांदेडपंचायत समितीच्या मासिक सभेवर सभापतीसह इतर सदस्यांनी बहिष्कार टाकला. अधिकारासाठी सभेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.नांदेड पंचायत समितीच्या मासिक सभेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीचे अधिकार दिवसेदिवस काढून घेतले जात आहे. त्यामुळे बैठका घेवून करायचे काय? असा सवाल पं.स. सभापती सुखदेव जाधव यांनी उपस्थित करत मासिक सभेला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला उपसभापतीसह इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. पंचायत समिती सदस्यांना १४ व्या वित्त आयोगातून पूर्वीप्रमाणेच निधी द्यावा, जिल्हा नियोजन समितीमध्ये सभापतींना सदस्य म्हणून घ्यावे, पं.स. सभापती व सदस्यांच्या मानधनात वाढ करावी, स्थानिक स्वराज्य संस्था (विधान परिषद) निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार द्यावा. त्याचवेळी पं. स. सदस्यास विकास कामे करण्यासाठी ५० लाख रुपयापर्यंतचा निधी उपलब्ध करुन द्यावा, सार्वजनिक व वैयक्तिक लाभांच्या योजनेची मान्यता देण्याचा अधिकार पंचायत समिती सभागृहाला देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी सभापती सुखदेव जाधव, उपसभापती शेख हसिना बेगम, पं.स. सदस्य प्रभू इंगळे, अ‍ॅड. राजू हटकर, गंगाधर नरवाडे, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, कावेरी वाघमारे, अनिता गर्जे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Nandedनांदेडpanchayat samitiपंचायत समितीStrikeसंप