शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

नांदेड जिल्ह्यातील पेठवडजमध्ये ‘बाटली’ उभीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:01 IST

नांदेड: कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दारुची बाटली आडवी का उभी? यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदार यादीतून ऐनवेळी वगळलेली नावे, तारखेत अनेकवेळा केलेला बदल अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात सापडली आहे़ प्रशासनाने मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचा दाखला देत उभ्या बाटलीचे समर्थन केले आहे़

ठळक मुद्देअनेक महिलांची नावे गायब, तारखेतही अनेकवेळा बदल मतदान प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दारुची बाटली आडवी का उभी? यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदार यादीतून ऐनवेळी वगळलेली नावे, तारखेत अनेकवेळा केलेला बदल अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक प्रक्रियाच आक्षेपांच्या भोवºयात सापडली आहे़ प्रशासनाने मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचा दाखला देत उभ्या बाटलीचे समर्थन केले आहे़जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेले कंधार तालुक्यातील पेठवडज हे गाव बाजारपेठेसाठी प्रसिद्ध़ परंतु वीटभट्टी आणि ऊसतोडीसाठी गावातील अनेक कुटुंब दरवर्षी स्थलांतर करतात़ त्यामुळे दारुबंदीसाठी दिवाळीपूर्वी मतदान घ्यावे, अशी मागणी गेल्या सात वर्षांपासून दारु विक्रीच्या विरोधात असलेल्या शिक्षिका जनाबाई भालेराव यांनी केली होती़, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले़ २० मे रोजी ग्रामसभेत ठराव झाला होता़ १५२९ महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन त्यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले़ त्यानंतर २३ जुलै रोजी मतदान घ्यावे असे पत्र काढण्यात आले़ उत्पादन शुल्कच्या नियमानुसार यावर एक महिन्यात कार्यवाही करणे अपेक्षित होते़परंतु मतदान घेण्याच्या सात दिवसांपूर्वी तशी नोटीस काढणेही आवश्यक आहे़ परंतु प्रशासनाने २१ नोव्हेंबरला पत्र काढले अन् २३ नोव्हेंबरला मतदान घेण्याचे ठरले, परंतु प्रशासकीय अडचण होण्याची चिन्हे दिसताच ९ डिसेंबरला मतदान घेण्याचे निश्चित करण्यात आले़ तत्पूर्वी स्वाक्षºयांची पडताळणी करण्यात आली़ पडताळणीला ६२९ महिला उपस्थित होत्या़ त्यामध्ये चुडाजी वाडीच्या महिलाही होत्या़ परंतु मतदानाच्या दिवशी मात्र मतदार यादीत त्यांची नावे नसल्याची बाब पुढे आली़ प्रशासनाने २४२० महिला मतदान करतील असे जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात या यादीतून मयत, लग्न होवून माहेरी गेलेल्या, स्थलांतरित या महिलांची नावे समाविष्ट होती़ प्रशासनाने सर्वेक्षण करुन मतदान यादीतून ही नावे गाळण्याची गरज होती, परंतु ती नावे तशीच ठेवून पात्र असलेल्या चुडाजी वाडीच्या महिलांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले़आजघडीला गावात सर्वेक्षण केल्यास १२०० पेक्षा अधिक महिला नसतील असा दावाही शिक्षिका भालेराव यांनी केला आहे़त्यामुळे मतदार यादीतील हा गोंधळ शेवटपर्यंत सुरुच होता़ मतदानाच्या वेळी काही मद्यपींनी गोंधळ घातल्यानंतर मतदान न करताच अनेक महिलांना माघारी पाठविण्यात आले़ असा आरोपही भालेराव यांनी केला आहे़ एकूणच बाटलीसाठी झालेली ही मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली आहे, परंतु त्यामध्ये दारुबंदीसाठी लढणाºया महिलांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे़ दारुबंदी होईपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार महिलांनी केला़लढा सुरुच राहणारदारुबंदीच्या विरोधात पेठवडजमध्ये २०११ पासून महिलांचा लढा सुरु आहे़ दारुमुळे आजपर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत़ दारुबंदीसाठी महिला पुढे आल्या़ परंतु प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही़ मतदार याद्यामध्ये गोंधळ होता़ मतदानाच्या तारखाही बदलण्यात आल्या़ त्यामुळे गोंधळात भरच पडली़ परंतु त्यामुळे खचून न जाता दारुबंदीचा हा लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार शिक्षिका भालेराव यांनी केला़