शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस बॅगमुळे शहरात बॉम्बची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड:शहरातील वजिराबादच्या मुख्य चौकात असलेल्या वैभव लॉजमध्ये थांबलेल्या आफ्रिकन युवकाच्या खोलीत वायरचा गुंता असलेली एक गूढ ...

ठळक मुद्देवैभव लॉज येथील घटना : आफ्रिकन युवक दोन दिवसांपासून बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:शहरातील वजिराबादच्या मुख्य चौकात असलेल्या वैभव लॉजमध्ये थांबलेल्या आफ्रिकन युवकाच्या खोलीत वायरचा गुंता असलेली एक गूढ वस्तू असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली़ बॉम्बशोधक व नाशक पथकाने बॅगेतील त्या वस्तूची तपासणी केली असता सदर वस्तू इलेक्ट्रॉनिक असल्याचे स्पष्ट झाले़, परंतु दोन दिवसांपासून खोलीत थांबलेला तो आफ्रिकन युवक परत न आल्यामुळे संशय बळावला होता़पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वैभव लॉजमध्ये १० डिसेंबर रोजी आकेश केनेर इंग्राको हा युवक आला होता़ खोली क्रमांक २७ मध्ये त्या दिवशी त्याने रात्रभर मुक्कामही केला़ त्यानंतर ११ डिसेंबरच्या सकाळी तो खोलीतून बाहेर पडला़, परंतु गेले दोन दिवस तो परत आलाच नाही़ मंगळवारी सायंकाळी झाडझूड करण्यासाठी गेलेल्या लॉजच्या कामगाराला खोलीत बॅग असल्याचे आढळून आले़ त्याने बॅगची चेन उघडून पाहिली असता, त्यामध्ये वायरचा गुंता एकमेकांना टेपद्वारे जोडल्याचे त्याला दिसून आले़ ही बाब कामगाराने त्वरित लॉज मालकाला कळविली़ त्यानंतर वजिराबादचे पोनि़ प्रदीप काकडे घटनास्थळी आले़यावेळी बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले़ श्वानपथकाने बॅगमध्ये काही स्फोटक पदार्थ असल्याचे संकेत दिले नाही़ परंतु तोपर्यंत परिसरात बॉम्बची अफवा उडाली होती़ लॉजबाहेर नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती़ बॉम्बशोधक पथकाने बॅग ताब्यात घेवून तपासणीसाठी फायर बटवर नेली़ या ठिकाणी जवळपास दोन तास बॉम्बशोधक पथकाचे कर्मचारी त्या वस्तूची तपासणी करीत होते़ सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता़ तपासणीनंतर केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला़ परंतु लॉजवर थांबलेला आफ्रिकन युवक नेमका गेला कुठे? याचे गूढ कायम आहे़४१० डिसेंबर रोजी वैभव लॉजवर आला होता आफ्रिकन युवक४रात्रभर मुक्कामानंतर ११ रोजी तो पडला बाहेर४ती वस्तू इलेक्ट्रॉनिकची