शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

नांदेडात भाजपातील अंतर्गत वाद शमेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:40 IST

महापालिका निवडणुकीत ५१ प्लसचा नारा देणाऱ्या भाजपाला निकालानंतर मात्र केवळ ६ जागा मिळाल्या. या सहा जागाही एकत्र ठेवण्यात भाजपाला अपयशच आले असून दहा महिन्यांच्या लढ्यानंतर मिळालेले विरोधी पक्षनेतेपदही पक्षातीलच नगरसेवकांच्या न्यायालयीन लढ्याने आता पत गमावण्याची वेळ भाजपावर आली आहे. पक्षामध्ये सुरू असलेला हा वाद मिटवण्यासाठी आता थेट मराठवाडा संघटक बुधवारी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेता पदाचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीत ५१ प्लसचा नारा देणाऱ्या भाजपाला निकालानंतर मात्र केवळ ६ जागा मिळाल्या. या सहा जागाही एकत्र ठेवण्यात भाजपाला अपयशच आले असून दहा महिन्यांच्या लढ्यानंतर मिळालेले विरोधी पक्षनेतेपदही पक्षातीलच नगरसेवकांच्या न्यायालयीन लढ्याने आता पत गमावण्याची वेळ भाजपावर आली आहे. पक्षामध्ये सुरू असलेला हा वाद मिटवण्यासाठी आता थेट मराठवाडा संघटक बुधवारी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सर्व यंत्रणा लावणा-या भाजपाला केवळ सहा जागा मिळाल्या. काँग्रेसने भाजपाचा धुव्वा उडवत ७३ जागांवर विजय मिळवला. सहा जागा मिळवलेला भाजप एकत्र राहील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी पक्षाने केली. पक्षाने यासाठी गुरप्रितकौर सोडी यांचे नाव सुचवले. प्रारंभी सत्ताधारी काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपदाची निवड या ना त्या कारणामुळे पुढे ढकलली. राज्यात सत्ता असतानाही नांदेड महापालिकेत मात्र भाजपाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत अर्जबाजारी करावी लागली. मात्र काँग्रेसने राजकीय डावपेच खेळत विरोधी पक्षनेते पदासाठी महापालिकेत एकमेव निवडलेल्या सेनेच्या तसेच एकमेव अपक्ष उमेदवाराने विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे सांगून वेळ मारुन नेली होती. जवळपास दहा महिन्यांच्या लढाईनंतर अखेर काँग्रेसने सभागृहात विरोधीपक्ष नेतेपदाचा विषय ठेवला. हा विषय ठेवला असताना भाजपाच्या पाच नगरसेवकांनी मात्र सभेला अनुपस्थिती लावली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने गुरप्रितकौर सोडी यांची निवड ११ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आली.सोडी यांना आपल्या निवडीचा हा आनंद जास्त काळ टिकवता आला नाही. कारण, पक्षाच्याच वैशाली मिलिंद देशमुख आणि दीपकसिंह रावत यांनी सोडी यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात विरोधी पक्षनेत्या गुरप्रितकौर सोडी यांच्यासह महापौर, मनपा प्रशासन यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. १२ आॅक्टोबर रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. एकूणच बोटावर मोजण्याइतक्या नगरसेवकांना एकत्रित बांधून ठेवण्यात भाजपा वर्षभरातच अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.बोटावर मोजण्याएवढेच संख्याबळ तरीही लाथाळ्यामहापालिकेत इन-मीन सहा नगरसेवक असलेल्या भाजपा नगरसेवकांचा हा वाद पक्षपातळीवर कळाल्यानंतर तो मिटवण्यासाठी पक्षाने मराठवाडा संघटक भाऊसाहेब देशमुख यांना बुधवारी नांदेडात पाठवले. देशमुख यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्या गुरप्रितकौर सोडी आणि अन्य पाच नगरसेवकांची बाजू देशमुख यांनी विश्रामगृहात रात्री उशिरा ऐकूण घेतली. देशमुख यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत सामंजस्याने वाट काढण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी न्यायालयीन प्रक्रियेबाबत सूचना केली. आगामी काळात वाद सार्वजनिक न करण्याबाबतही त्यांनी ताकीद दिली.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण