शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटातही भाजपाचे गलिच्छ राजकारण; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी डागली तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:17 IST

राजभवनाचे उंबरठे झिजवून ही मंडळी गलिच्छ राजकारण करीत आहेत. सरकार अस्थिर करण्याच्या या कारस्थानाची कीव येते असेही त्या म्हणाल्या.  

ठळक मुद्देसुर्यकांता पाटील यांनी सोशल मिडीयाद्वारे राजकारणातून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करीत आहेत.

नांदेड : कोरोना संकटाने जगभर थैमान घातले आहे. राज्यातही अनेक मृत्यू झाले आहेत. प्रत्येकाच्या दारात मृत्यू उभा आहे. अशा या परिस्थितीत सर्वांनी एकत्रित येवून या संकटाचा सामना करणे अपेक्षित असताना भाजपाचे काही नेते सत्तेसाठी राजभवनाचे उंबरठे  झिजवत आहेत. हे खेदजनक तसेच संतापजनक असल्याची टिका करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. जे काही घडते आहे ते वेदनादायी असल्याचे सांगत हा सर्व प्रकार पाहूनच राजकारणात रहावे की नाही? असा प्रश्न पडतो. असे सांगत आपण आपली भूमिका लवकरच जाहीर करु, असेही त्या म्हणाल्या

सुर्यकांता पाटील यांनी सोशल मिडीयावर संदेश टाकून आपण राजकारणातून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमिवर त्यांच्याशी संपर्क साधला असता,  राज्यात कोरोनाचे संकट गंभीर  आहे. या परिस्थितीत सरकारच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी काही मंडळी सत्तेसाठी राजभवनाचे उंबरठे झिजवून गलिच्छ राजकारण करीत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यात महाविकास आघाडीला अपयश आल्याचा कांगावा करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात आणीबाणी लागू करावी, अशी मागणी करत राजभवनाला खेटे घातल्याचे सांगत, भाजपाच्या राजकारणावर त्यांनी घणाघात टिका केली.  

राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या जीवाची चिंता लागली आहे. मरण दारात उभे आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करीत आहेत.  राज्यात मोठ्या प्रमाणावर सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ते प्रयत्नशिल असताना ज्यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगले, ज्यांना अनुभव आहे अशा मंडळींनी आपल्या अनुभवाचा फायदा सरकारला करुन देणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाचे उंबरठे झिजवून ही मंडळी गलिच्छ राजकारण करीत आहेत. सरकार अस्थिर करण्याच्या या कारस्थानाची कीव येते असेही त्या म्हणाल्या.  

टॅग्स :BJPभाजपाNandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्या