शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भाजपाची धोरणे केवळ श्रीमंतांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:39 IST

देशातील व राज्यातील भाजप सरकार मनुवादी विचारांचे व सामाजिक विषमता निर्माण करणारे आहे. या सरकारची धोरणे केवळ मोजक्या श्रीमंतांसाठी आहेत. त्यामुळे या भाजपा सरकारला खाली खेचा, काँग्रेसला सत्ता द्या.

ठळक मुद्देविविध घटकांशी अशोकराव चव्हाण यांनी साधला संवाद

नांदेड : देशातील व राज्यातील भाजप सरकार मनुवादी विचारांचे व सामाजिक विषमता निर्माण करणारे आहे. या सरकारची धोरणे केवळ मोजक्या श्रीमंतांसाठी आहेत. त्यामुळे या भाजपा सरकारला खाली खेचा, काँग्रेसला सत्ता द्या. आपल्या सर्व मागण्या पूर्ण करु, असे आश्वासन काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांनी दिले.मातंग समाज आणि अखिल भारतीय माळी महासंघाची बैठक जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात घेण्यात आली. तसेच धनेगाव येथे वाहन मालक - चालक संघटनेच्या बैठकीतही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी विचार मांडले.यावेळी आ. डी. पी. सावंत, गोविंद शिंदे नागेलीकर, नरेंद्र चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशात सामाजिक समतोल असणे महत्त्वाचे आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात सामाजिक विषमता निर्माण करण्यात आली आहे. घोषणांद्वारे केवळ कोपराला गुळ लावण्याचे काम भाजप करीत असल्याची टीकाही खा. चव्हाण यांनी केली. ते म्हणाले, माळी समाज व मातंग समाज हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार आहे. सत्तेचा वाटा सर्व समाजाला मिळाला पाहिजे. ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे. काँग्रेस सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने सामाजिक समतोलाची विचारसरणी जिल्हा पातळीपर्यंत रुजवली आहे.केवळ मताची विभागणी टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व समाजवादी पक्षाला मते देवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.गुरुद्वारा प्रबंधक समितीमध्ये लोकनियुक्तऐवजी शासननियुक्त अध्यक्ष करण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडला पाहिजे, असेही खा. चव्हाण यांनी सांगितले.या सभेत बोलताना आ. डी. पी. सावंत यांनी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचा आॅटोमोटिव्हचा व्यवसाय आहे. पण भाजपचे उमेदवार मात्र बेनामी दारु दुकाने इतरांच्या नावे करुन पैसे कमावतात.दारुमुळे कोणाला रोजगार मिळत नाही तर अनेकांचे संसार देशोधडीला लागतात. अशोक चव्हाण हे दारुचे डीलर नव्हे तर जनतेचे लीडर आहेत, असेही आ. सावंत यांनी सांगितले. मोदीची नांदेडमध्ये झालेली सभा म्हणजे जुनी कॅसेट आहे. या कॅसेटमध्ये त्यांना उमेदवाराचे नावही आठवले नाही. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा उल्लेखच पंतप्रधानांनी केला नसेल तर त्यांना जनतेने काय म्हणून मते द्यावी, असा सवालही आ. सावंत यांनी व्यक्त केला.यावेळी आनंद गुंडले, अ‍ॅड. सुरेंद्र घोडजकर, प्रदीप वाघमारे, रामेश्वर भालेराव, सुखविंदरसिंघ हुंदल, सखाराम शितळे, प्रल्हाद सोळंके, गणपतराव उमरे, गणेश तादलापूरकर, भीमराव जेठे, शेख फारुख, भागिंदरसिंघ घडीसाज आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा