शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

BharatJodoYatra: घाबरलेल्या भाजपकडून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न

By शिवराज बिचेवार | Updated: November 9, 2022 12:15 IST

ही चुनाव जितो यात्रा नाही, परंतू यात्रेमुळे काँग्रेसला संजीवनी

नांदेड- येणाऱ्या निवडणुकीत या यात्रेचे काय परिणाम होतील याचा आम्ही विचार करीत नाही. तो येणारा काळ ठरवेल. परंतु एवढे मात्र नक्की या यात्रेमुळे भाजप मात्र घाबरली आहे, त्यामुळेच दररोज टी शर्ट कोणते घातले?, काय जेवण केले? यावरून टीका करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला. 

भारत जोडो यात्रा नायगाव येथे पोहचल्यानंतर रमेश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोदी यांनी कोणताही विचार न करता नोटबंदी केली. त्यामुळे उद्योग, शेतकरी यासह सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत ही भारत जोडो यात्रा काढली आहे. निवडणुकीत या यात्रेचे काय परिणाम होतील याचा आम्ही विचार करीत नाही. तो येणारा काळ ठरवेल. परंतु एवढे मात्र नक्की या यात्रेमुळे भाजप मात्र घाबरली आहे, त्यामुळेच दररोज टी शर्ट घातले, काय जेवण केले यावरून टीका करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण पहिल्यांदाच काँग्रेस एवढ्या आक्रमक पणे राजकीय एजंडा घेऊन रस्त्यावर उतरली आहे. 

राहुल यांच्या ६५ दिवसांत ५ प्रेसया देशात 12 वर्ष राज्याचा आणि आठ वर्षे देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने अद्याप एकही प्रेस घेतली नाही, तर राहुल गांधी यांच्या गेल्या 65 दिवसात 5 प्रेस झाल्या आहेत. पुढची पत्रकार परिषद 17 तारखेला शेगाव येथे होणार आहे. असेही रमेश म्हणाले.

कॉंग्रेसला मिळाली संजीवनी राज्यात होत असलेल्या निवडणुका किंवा 2024 ची लोकसभा समोर ठेऊन आम्ही ही भारत जोडो यात्रा काढली नाही. त्यामुळे ही चुनाव जितो यात्रा नाही. परंतु या यात्रेमुळे काँग्रेस ला मात्र संजीवनी मिळाली असून ती पुनरुज्जीवत झाली आहे.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेड