शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: नांदेड सज्ज! भव्य मंडपात एकाच डायनिंग टेबलवर पाचशे जणांचे जेवण

By शिवराज बिचेवार | Updated: November 7, 2022 12:09 IST

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

नांदेड: काँग्रेसचे राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी देगलूर मार्गे रात्री उशिरा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सोमवारी देगलूरलाच मुक्कामानंतर ही यात्रा मंगळवारी बिलोली तालुक्यातील शंकरनगर, रामतिर्थ भागात येईल. येथे यात्रेतील लोकांसाठी तब्बल १०० बाय २५० या ॲल्युमिनिअमचा वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. नागपूर येथील एका डेकोरेटरने हा मंडप उभारला आहे. त्यामध्ये तब्बल पाचशे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. यात्रा मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी नेते, कार्यकर्ते यांच्या राहण्याची आणि भाेजनाची व्यवस्था करण्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. गोदावरी मानार पब्लिक स्कुलच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात व्हीआयपीसाठी ६० स्वतंत्र केबीनची व्यवस्था केली आहे. मंडप क्रमांक २ हा ६५ बाय १०० चा डायनिंग हॉल असून त्यामध्ये एकाच वेळी खुर्चीवर बसून ५०० जणांना जेवण करता येणार आहे. तसेच शंकरनगर येथे पाच ते सहा हजार जणांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. भोपळा येथे राहूल गांधी आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या कॉर्नर सभा होणार आहेत.

गादी, बेडशीट, उशी अन् पांघरणसध्या कडक हिवाळ्याचे दिवस आहेत. सकाळी सहा वाजेपासून सुरु झालेली भारत जोडो यात्री रात्री साडे सात वाजेपर्यंत सुरु राहते. त्यानंतर कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे वॉटरप्रुफ मंडप उभारुन त्यामध्ये कार्यकर्त्यांना विश्रांतीसाठी ठराविक अंतरावर गादी, त्यावर बेडशीट, उशी आणि उबदार पांघरणाची व्यवस्था केली आहे.

राहूल गांधी ए कॅम्पमध्येपदयात्रेतील कार्यकर्ते आणि नेते यांच्या मुक्कामासाठी उभारण्यात आलेल्या कॅम्पला ए,बी आणि सी अशी नावे देण्यात आली आहेत. त्यात राहूल गांधी यांचा ताफा ए कॅम्पमध्ये राहणार आहे. त्यांच्या ताफ्यात एकुण पाचशे जणांचा समावेश आहे. देगलूर महाविद्यालय परिसरात असलेल्या बी कॅम्पमध्ये पाचशे व्हीव्हीआयपीची व्यवस्था असेल. तर सी कॅम्पमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहणार आहेत.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राNandedनांदेडRahul Gandhiराहुल गांधी