यशवंत महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्पिरीच्युअल एज्युकेशन कमिटीच्या संयुक्त विद्यमाने सिस्को वेबेक्सवर आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेच्या समारोपीय व्याख्यानात ‘स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हा’ या विषयावर २२ मे रोजी ते बोलत होते.
प्रा. डॉ. गोणारकर म्हणाले की, जो जन्माला येतो तो मरतो.हे निसर्गाचे चक्र कोणालाही नाकारता येणार नाही. मानवी जीवन हे विणेसारखे आहे. विणा जास्त ताणली तर तुटण्याची भीती व तारेला ढील दिली तर संगीत निर्माण होणार नाही. बुद्ध तत्त्वज्ञान सम्यक व मध्यम पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग देते. तथागत बुद्धांनी स्वतःला मार्गदाता संबोधले; मुक्तिदाता नाही. तथागत बुद्धाच्या मैत्रीचा,करुणेचा भाव आपल्यामध्ये आल्यानंतरच आपल्या सर्वांचे जीवन सुखी व आनंदी होईल.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका प्रा.डॉ.एल.व्ही.पद्मा राव, स्पिरिच्युअल एज्युकेशन कमिटीचे समन्वयक प्रा.डॉ.डी.डी.भोसले, प्रा.डॉ.अजय गव्हाणे, प्रा.व्ही.जी.स्वामी, प्रा.डॉ.राजकुमार सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रा.डॉ.डी.डी.भोसले यांनी केले. व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अजय गव्हाणे यांनी केले.प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.डॉ.एल.व्ही.पद्मा राव यांनी करून दिला तर आभार प्रा.डॉ.राजकुमार सोनवणे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, कार्यालयिन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक गजानन पाटील व कालिदास बिरादार, विनायक मळगे, व्ही.पी.सिंग ठाकूर,बालाजी देशमुख, अच्युत साळवे, रंगनाथ जाधव, मोहम्मद फसी, जगन्नाथ महामुने आदींनी परिश्रम घेतले.