शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा स्मशानभूमी दुर्लक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:41 IST

हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच अंत्यविधी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ ने पुढे आणला. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असतानाही जिल्हा परिषद या प्रश्नाबाबत ढीम्मच असल्याचे दिसून येते. जिल्हा वार्षिक योजनेतून दहन व दफनभूमीसाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र यातील अवघ्या एका स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले असून चार कामे प्रगतीपथावर आहेत तर उर्वरित १६ कामांना अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.

ठळक मुद्दे१ कोटी ४४ लाख मंजूर : अवघे एक काम पूर्ण; १६ प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच अंत्यविधी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ ने पुढे आणला. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असतानाही जिल्हा परिषद या प्रश्नाबाबत ढीम्मच असल्याचे दिसून येते. जिल्हा वार्षिक योजनेतून दहन व दफनभूमीसाठी १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र यातील अवघ्या एका स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले असून चार कामे प्रगतीपथावर आहेत तर उर्वरित १६ कामांना अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच अंत्यविधी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ ने पुढे आणला होता. या ठिकाणच्या मागासवर्गीय समाजबांधवांना अंत्यविधीसाठी इतर ठिकाणी जागा नसल्याने शाळेसमोरील जागेतच अंत्यविधी केला जात आहे. या स्मशाभूमीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता असतानाही त्याकडे जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असतानाच स्मशानभूमीच्या एकूणच प्रश्नासंदर्भात प्रशासन उदासीन असल्याचेही दिसून येते. जिल्ह्यात विविध ठिकाणी स्मशानभूमीची आवश्यकता असून काही ठिकाणी दुरुस्तीच्या कामाचीही गरज ग्रामस्थांतून वारंवार व्यक्त केली जाते.जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) सन २०१७-१८ अंतर्गत दहन व दफनभूमीच्या २१ कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यात नांदेड पंचायत समितीअंतर्गत ४, अर्धापूर ५, कंधार, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, हदगाव पंचायत समितीअंतर्गत प्रत्येकी १ तर मुखेड, हिमायतनगर आणि माहूर पंचायत समितीअंतर्गत प्रत्येकी २ अशा २१ कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या कामांसाठी १ कोटी ४४ लाखांचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. यात नांदेड येथील ४ कामांसाठी १८ लाख १० हजार, अर्धापूर ६५ लाख, कंधार ४ लाख १० हजार, मुखेड १७ लाख १० हजार, देगलूर, हदगाव प्रत्येकी ५ लाख, बिलोली,नायगाव, धर्माबाद प्रत्येकी ४ लाख १० हजार तर हिमायतनगर ८ लाख २० हजार आणि माहूर येथील दोन कामांसाठी १० लाखांच्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र यातील केवळ अर्धापूर पंचायत समितीकडून स्मशानभूमीची पाच कामे सुरु करण्यात आली असून त्यातील एका कामाला अद्याप सुरुवात झालेली नसली तरी उर्वरित चार कामे प्रगतीपथावर आहेत.मंजृूर ६५ लाखांपैकी ६० लाखांचा निधी अर्धापूर पंचायत समितीने खर्चही केला आहे. नांदेड पंचायत समिती अंतर्गतचे एक काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र इतर पंचायत समित्यांनी अद्यापही स्मशानभूमीची कामे सुरु केलेली नाहीत. निधी मंजूर असूनही जिल्ह्यातील १६ कामांना सुरुवात झालेली नाही. यात नांदेड पंचायत समितीअंतर्गत ३, अर्धापूर, कंधार, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, हदगाव या पंचायत समितीअंतर्गतचे प्रत्येकी एक तर मुखेड, हिमायतनगर आणि माहूर पंचायत समिती अंतर्गतच्या प्रत्येकी दोन कामांना अद्याप मुहूर्तही लागलेला नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन स्पष्ट होते.कानाडोळा : कामांना गती मिळणार कधी ?हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे शाळेसमोरच अंत्यविधी केला जात असल्याचे ‘लोकमत’ ने पुढे आणले. अशाच प्रकारची अवस्था जिल्ह्याच्या इतर भागातही आहे. स्मशानभूमी उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. याबरोबरच जेथे स्मशानभूमीची मागणी आहे तेथे उभारणीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. मात्र एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे स्मशानभूमीच्या २१ कामांना मंजुरी मिळालेली असतानाही आणि त्यासाठी तब्बल १ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात कामे सुरु होत नसल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळा