शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

किनवट, माहुरात आरोग्यसेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:12 IST

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे रिक्त आहेत़ केवळ एकाच वैद्यकीय अधिकाºयावर सहा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चालवला जात असल्याचे भयानक चित्र आहे़ माहूर तालुक्याची स्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही़ आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे रिक्त आहेत़ केवळ एकाच वैद्यकीय अधिकाºयावर सहा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चालवला जात असल्याचे भयानक चित्र आहे़ माहूर तालुक्याची स्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही़ आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे़किनवट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ९ प्राथमिक केंद्र असून ६५ आरोग्य उपकेंद्र आहेत़ तसेच एक नागरी दवाखाना आहे़रुग्णांसाठी प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक असताना बोधडी, जलधरा, इस्लापूर वगळता अन्य सहा आरोग्य केंद्रात केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे़ दिवसरात्र सेवा देण्याचे काम एकच वैद्यकीय अधिकारी करतात़ रिक्त व प्रतिनियुक्ती आरोग्य कर्मचाºयांचीही वाणवा आहे़ रिक्त पदांमुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्या आहेत़एकीकडे शासन बालमृत्यू, कुपोषणमुक्ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असताना दुसरीकडे उपरोक्त भयानक चित्र पहावयास मिळते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पं़ स़ सदस्य नीळकंठ कातले यांनी केली़ आजघडीला शिवणी, अप्पारावपेठ, मांडवी, उमरी बाजार, दहेलीतांडा, राजगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ एकच डॉक्टर असून चार पदे रिक्त आहेत तर दोन गैरहजर अशी परिस्थिती असल्याचेही कातले यांनी सांगितले़कर्मचाºयांची रिक्त पदे भरावीत, प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात अन्यथा २५ जानेवारी रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल, असेही कातले यांनी सांगितले़श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यात सहा वैद्यकीय अधिकाºयांवर आरोग्य विभागाचा भार आहे़ चार वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य सेवाच सलाईनवर आहे.माहूर शहरात ग्रामीण रुग्णालय आहे़ तर वानोळा, इवळेश्वर, आष्टा, वाई बा़, सिंदखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे़ शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्तीला मंजुरी आहे़ सध्या सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत़ वानोळा, ईवळेश्वर, आष्टा, वाई बा़ येथे प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त आहे़ या चार ठिकाणी एकाच वैद्यकीय अधिकाºयावर भार पडत आहे़ वर्ग- ३ व वर्ग- ४ ची पदे सुद्धा रिक्त आहेत.रिक्त पदे- तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रात मलेरिया विभागातील आष्टा १, कुपटी १, सेलू १ असे एकूण तीन पदे रिक्त आहेत़ वानोळा, सिंदखेड, इवळेश्वर, आष्टा येथील वाहनचालकांची प्रत्येकी १ असे एकूण ४ पदे रिक्त आहेत़ वानोळा १, सिंदखेड १ असे एकूण दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर परिचरची सात पदे रिक्त आहेत़उपकेंद्राची इमारत धूळखातमागील पाच वर्षांपूर्वीच वानोळा आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले़ मात्र इमारतीचे हस्तांतरण न झाल्याने धूूळखात आहे.सध्या तालुक्यात कुठेही साथरोग नाही़ तालुक्यात लसीकरण शिबिरे, तपासणी कार्यक्रम सुरू आहेत़ आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असे आवाहन आरोग्य कर्मचारी घरोघर जावून करीत आहेत़ रिक्त डॉक्टर व कर्मचाºयांची पदे भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालय आणि अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला आहे -डॉ़ साहेबराव भिसे, तालुका आरोग्य अधिकारी, माहूऱ