लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आंतरजिल्हा बदलीने किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यात पदस्थापना देण्यात आलेल्या व त्याठिकाणी अद्याप रूजू न झालेया शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी गुरूवारी शिक्षण समितीच्या बैठकीत केली़शिक्षण समितीची बैठक शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरूजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ खाजगी अनुदानीत शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे आॅनलाईन पद्धतीने समायोजन करण्यात आले़ परंतु काही संचालक अशा शिक्षकांना रूजू करून घेत नाहीत़ त्या संस्थांना शिक्षकांना रूजू करण्यास्तव सूचना करावी, आणि उर्वरित शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदावर समायोजन करावे, अशी मागणीही सदस्यांनी केली़ विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले सर्व बेंच व डेस्क खराब न होवू देता ज्या शाळेत विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्थेसाठी आवश्यक आहेत, अशा शाळांना देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला़ नवीन शाळा खोली बांधकाम व संरक्षण भिंत बांधकामासाठी सर्व जिल्ह्यातील आराखडा सर्व शाळेतील प्रस्ताव मागवून त्यासाठी लागणाºया निधीची मागणी करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांना भेटण्याचेही यावेळी ठरले़ बैठकीस जि़प़ सदस्य व्यंकटराव गोजेगावकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, साहेबराव धनगे, अनुराधा पाटील खानापूरकर, संध्याताई धोंडगे, ज्योत्स्ना नरवाडे आदी उपस्थित होते़
पदस्थापना दिलेल्या शिक्षकांची रूजू होण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:08 IST
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : आंतरजिल्हा बदलीने किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यात पदस्थापना देण्यात आलेल्या व त्याठिकाणी अद्याप रूजू ...
पदस्थापना दिलेल्या शिक्षकांची रूजू होण्यास टाळाटाळ
ठळक मुद्देशिक्षण समितीची बैठक : रूजू न झालेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी