शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
3
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
4
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
5
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
6
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
7
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
8
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
9
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
10
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
11
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
12
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
13
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
14
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
15
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
16
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
17
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
18
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
19
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
20
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन

‘भिजलेल्या गोष्टींनी’ प्रेक्षकही भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:08 AM

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चुरशीची होत आहे. गुरूवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ आणि ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ ही नाटके सादर झाली. या दोन्ही नाटकांना उपस्थिती प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विनोदी पठडीतील ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ हे नाटक पाहतांना प्रेक्षकांतून हास्य व टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

ठळक मुद्देहौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा: श्रद्धांजलीलाही प्रेक्षकांतून हास्याचे फवारे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी चुरशीची होत आहे. गुरूवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ आणि ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ ही नाटके सादर झाली. या दोन्ही नाटकांना उपस्थिती प्रेक्षकांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विनोदी पठडीतील ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ हे नाटक पाहतांना प्रेक्षकांतून हास्य व टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.शहरातील कुसूम सभागृहात गुरूवारी मयूर निमकर लिखीत ‘भिजलेल्या गोष्टी’ हे नाटक सादर झाले. नवराम दर्शन को.आॅ. हौ.सो. डोंबिवली यांनी सादर केलेल्या या नाटकाने दोन व्यक्तीमधील सामाजिक दरी यावर भाष्य केले. एखाद्या आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून वाईट ठरवितो. वस्तुत: आपण स्वत:च्या अनुभवानंतर एखाद्या व्यक्तीबाबतचे मत ठरविले पाहिजे. परंतु, असे होत नसल्याने आपण माणूस ओळखू शकत नाही. हिच बाब ‘भिजलेल्या गोष्टींनी’ अधोरेखीत केली. या नाटकात लेखकाने तीन कथानकांचा आधार घेवून वरील मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे. विशेष म्हणजे नाटकातील तीनही कथानकात दोन व्यक्तीतील दरी संपविण्यासाठी पाऊस धावून आल्याचे दिसते. बाहेर जोराचा पाऊस सुरू असताना कार्यालयात अडकलेली स्त्री आणि तिचा बॉस यांच्या संवाद होतो आणि त्या दोघांतील गैरसमज दूर होतात. दुसरे कथानकही अशाच पद्धतीचे पावसामुळे रेल्वेस्टेशनवर थांबलेल्या युवकास कधीकाळी त्याची प्रेमिका असलेल्या युवतीची भेट होते. दोघे एकमेकांवर प्रेम करीत होते. मात्र, तिचे लग्न दुसºयाशी झाले. त्यानंतर दोघांचीही मने एकमेकांविषयी दुषित झाली. मात्र पावसाच्या निमित्ताने का होईना, दोघांत संवाद घडतो. आणि ते एकमेकांना समजून घेतात. तिसरे कथानकही असेच पावसात घडते, या भिजलेल्या गोष्टी जीवंत करण्याचे काम तीन व्यक्तीरेखा साकारणाºया मयूर निमकरने ताकतीने केले. त्याला तेजल पोतदार, समीर जडे, स्वप्नील माळवदे, अंकूर निमकर, शेखर नंद, रेश्मा कदम यांचीही साथ लाभली.जिवंत व्यक्ती नव्हे तर मोबाईलच झालाय मित्रशंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात बुधवारी रात्री सादर झालेल्या ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोबाईलच्या आहारी गेलेला मानव जीवंत व्यक्तींना नव्हे, तर यंत्र असलेल्या मोबाईलला आपला खरा मित्र मानू लागला आहे. त्यामुळेच तो वास्तव जगापासूनही दूर जात असल्याचे या नाटकातून अत्यंत विनोदी पद्धतीने सादर करण्यात आले. विशेषत: वनिता खरात यांनी साकारलेले कोकरा काकू ही भूमिका लक्षवेधी ठरली. या काकू व्यासपिठावर आल्यानंतर हास्याची लकेर उमटत होती. दिपेश ठाकरे, वैष्णवी अंबवणे, आतिश मोरे, संकेत खेडेकर, स्वप्नील पाथरे, विकास मोटे, तुषार दळवी, किरण फडतरे, सिद्धेश माने, तेजस बोराडे, अमृता मोडक, सागर पवार, विपूल काळे, विक्रांत गबरे, सिद्धेश चव्हाण, सिद्धांत महाडीकर यांनीही यात भूमिका साकारल्या.