शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
2
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
3
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
4
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
6
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
7
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
8
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
9
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
10
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
11
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
12
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
13
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
14
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
15
कमी मार्क मिळाले म्हणून आई-वडील ओरडले, रागाच्या भरात १०वीतील मुलगी छतावर गेली अन्...
16
Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!
17
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
18
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
19
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
20
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीचाही कालवा फुटला; कालवे फुटण्याची मालिका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:18 IST

सोमवारी अंबाळा (३८ क्रमांक) कालवा फुटल्याने काही पाणी पुढे वाहून गेले़ या पाण्याने आष्टीचा कालवा फोडला़ कालवे फुटणे दुर्घटना आहे की कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांतील शितयुद्ध? याबद्दल विविध चर्चा सुरू आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : सोमवारी अंबाळा (३८ क्रमांक) कालवा फुटल्याने काही पाणी पुढे वाहून गेले़ या पाण्याने आष्टीचा कालवा फोडला़ कालवे फुटणे दुर्घटना आहे की कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांतील शितयुद्ध? याबद्दल विविध चर्चा सुरू आहे़दाती सीआर नं. २ कालवा शाखेचा विसर्ग (संकल्पित) १२़२२ क्यूमेक्स असताना केवळ ९ क्यूमेक्स पाणी विसर्ग करता येते़ यामुळे पाणी शेवटपर्यंत जाण्यासाठी विलंब होतो़ शाखा कालव्याच्या साखळी क्रमांक १३२५, ६७९०, ७८६०, १७३१२, १९३८०, २८१८५, ४७६०२, ६०७५०, ६७९४५, ६८६३०, ७२३४०, ८३०२० या साखळी क्रमांकावर वरील जलसेतू नादुरुस्त आहेत़ त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याच शाखा कालव्यावरील एचपीसी साखळी क्रमांक ३०२०, १००५३, १०८९०, ११८९७, १२०७०, १२७३०, १३४३०, १६५७०, २००००, २०२००, २६२३८, २९६४३, २९९१५, ३००८५ नादुरुस्त असून एचपीसीवरील अस्तरीकरणामध्ये छिद्रे आहेत़ अस्तरीकरणास भेगा पडल्या. शाखा कालव्याचे साखळी क्रमांक ७०००० ते ८०२०० मी़ मधील कालव्याच्या काटछेदात मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढले. साखळी क्रमांक ८०,००० मी़ ते ९०,००० मी़ पर्यंतच्या भागात कालव्याच्या काटछेदाचे आकारमान संकल्पनाप्रमाणे पूर्ण झाले नसल्याने तलमान ठिकठिकाणी उंच व खोल आहेत़ कालव्याचा भराव ठिकठिकाणी नादुरुस्त अवस्थेत आहे़ त्यामुळे संकल्पनेच्या तुलनेत फक्त २० टक्के पाणी विसर्ग प्रवाहित होवू शकते़ साखळी क्रमांक ८०,००० ते ९०,००० मीटरपर्यंत अस्तरीकरणाचे काम पैनगंगा प्रकल्प विभाग क्ऱ५ हदगाव प्रस्तावित आहे़ त्यामुळे उभ्या पिकाला पाणी विसर्ग करणे शक्य होणार नसल्याचे पत्र जिल्हा कार्यालयास डिसेंबर महिन्याच्या १८ तारखेला देण्यात आले, मात्र पत्राची दखल घेण्यात आली नाही.कालवा फुटला की निधी येतो अन् काम सुरु होतेकालव्याच्या कामाला निधी नाही, असे सांगितले जाते, मात्र कालवा फुटल्यानंतर कामासाठी निधी मिळतो, हे कसे काय? निधी येतो कुठून? तोच निधी फुटण्यापूर्वीच वापरला असता तर पाणी वाया गेले नसते़ मात्र उलटेच झाले़ पाणी वाया गेले़ शेतकºयांची पिके करपली़ शासनाचा पाणीकर बुडाला व कामासाठी तत्काळ निधीही उपलब्ध करून द्यावा लागला़ यापूर्वी आष्टीला दोनदा कालवा फुटला होता़ खरे तर याच मार्गावर आजी-माजी आमदारांची शेती आहे़ तरीही कामे ढिसाळ झाली़ पुढाºयांचा अधिकाºयांवर जरब नाही, हे यावरुन सिद्ध होते.दरम्यान, हदगावचे सक़ार्यकारी अभियंता आऊलवार यांची बदली झाल्याने आता त्यांचा पदभार कोणाला मिळतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे कालवा फुटण्याची मालिका सुरू आहे की काय, अशी चर्चा सुरू आहे़