बाजार समितीत हळदीची आवक कमी असताना १० ते ११ हजार रुपये भाव मिळत होता, तर आता दररोज नवामोंढा येथे १ हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. त्यामुळे हळदीला साडेसहा ते ८ हजारच्या दरम्यान भाव मिळत आहे.
चौकट-
शेतकऱ्यांना नेहमीच अशा परिस्थितीतून जावे लागते. शेतमालाची आवक वाढली की बाजारात त्याची किंमत कमी हाेते. त्यामुळे केलेल्या परिश्रमाचा योग्य मोबदला मिळत नाही. आताही हळदीची आवक वाढताच भाव कमी झाले आहेत. - हनुमान चंदेल, महिपाल पिंपरी.
चौकट-
नांदेड कृषी बाजार समितीने खुले सौदे बंद करून थेट आलेल्या हळदीसाठी लिलाव सुरू केले आहेत. हा निर्णय चांगला आहे. यामुळे बाजार समिती व शेतकरी या दोघांचाही फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे त्याच दिवशी वजन होत आहे. - प्रल्हाद इंगोले, शेतकरी नेते