शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

साडेआठ कोटींचे पर्यटनयात्री संकुल अडकले बाभूळबनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:48 IST

भाविकांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारच्या निधीतून साडेआठ कोटी रुपये खर्च करून माहूर तीर्थक्षेत्रावर उभारलेले पर्यटनयात्री संकुल पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उद्घाटनाअभावी ही देखणी इमारत बाभूळबनात अडकली असून, इमारतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे.

ठळक मुद्देउद्घाटनाची प्रतीक्षा यात्राकाळात खासगी लॉजिंगकडून भाविकांची आर्थिक लूट

नितेश बनसोडे।श्रीक्षेत्र माहूर : भाविकांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारच्या निधीतून साडेआठ कोटी रुपये खर्च करून माहूर तीर्थक्षेत्रावर उभारलेले पर्यटनयात्री संकुल पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उद्घाटनाअभावी ही देखणी इमारत बाभूळबनात अडकली असून, इमारतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे. दुसरीकडे, मोकाट गुराढोरांचा येथे वावर वाढला असून अवैध व्यावसायिकसुद्धा या केंद्रावरून ‘रात्रीस खेळ चाले’ चा प्रयोग अवलंबत असल्याची चर्चा आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी शिखर संस्थानची साडेआठ एकर जमीन हस्तगत करून केंद्र सरकारच्या निधीतून पर्यटन संकुलाची भव्य वास्तू उभारली गेली. मातृतीर्थ परिसराकडे जाणाऱ्या निसर्गरम्य जागेत सदरील पर्यटक निवास बांधले आहे. या ठिकाणी अद्ययावत मिनी बसस्थानक, भव्य वाहनतळ, सुसज्ज उपाहारगृह, भव्य दरबार हॉल व यात्रीनिवास बांधण्यात आले आहे. मात्र लोकार्पणाअभावी हा कोट्यवधीचा निधी वाया जात असल्याचे दिसून येते.शहरातील काही मंदिर विश्वस्तांच्या स्वत:च्या मालकीचे खासगी लॉज तसेच यात्रीनिवास आहेत. यात्राकाळात माहूरला भाविकांची मोठी गर्दी होते़ यावेळी निवासासाठी थांबणाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतानाही सरकारी निधीतून उभारलेले हे निवास सुरु करण्यात प्रशासन का टाळाटाळ त आहे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. साडेआठ कोटींच्या पर्यटनयात्री संकुलाचे पालकत्व स्वीकारून भाविकांना सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे़पाचोंद्याचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समोवश व्हावामौजे पाचोंदा हे पुरातन तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्राचा रामायणातसुद्धा उल्लेख आहे. मात्र त्यानंतरही प्रचार-प्रसाराअभावी हे तीर्थक्षेत्र विकासापासून कोसोदूर आहे. माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणात या तीर्थक्षेत्राचा समावेश करून विकास केल्यास निसर्गरम्य वनराईने नटलेला हा परिसर तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा नावारूपास येऊ शकतो. येथील तीर्थक्षेत्र हे उनकेश्वर ता.किनवट येथील शाखेची उपशाखा असून प्रभू श्री रामचंद्र माहूर येथील अनसूया मातेच्या दर्शनाला आले असता ते पाचोंदा या तीर्थक्षेत्रावरसुद्धा आल्याचा इतिहासात उल्लेख आहे. या क्षेत्राचे नाव पांचाळेश्वर असे होते. तेव्हापासून या तीर्थक्षेत्रावर प्रभू श्री रामाचे मंदिर आहे. ज्यांना हा इतिहास माहीत आहे. ते माहूरगडावर आल्यानंतर पाचोंदा येथे येतात. माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणअंतर्गत विकास आराखड्यत समावेश असलेले वझरा (शे.फ.) या गावापासून हे क्षेत्र केवळ ४ कि.मी अंतरावर आहे़ हे तीर्थक्षेत्र निसर्गरम्य वनराईने नटलेले असून या तलावाचा विकास झाल्यास इको टुरिझम येथे यशस्वी होऊ शकते.त्यासाठी प्रशासनाने या पुरातन तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

शासनाने द्यावे लक्षपाचोंदा हे क्षेत्र अतिदुर्गम जंगल भागात असल्याने वनविभागामार्फत विकास करता येईल यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांना भेटून विकास योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - अ‍ॅड़ रमण जायभायेपाचोंदा तीर्थक्षेत्र उनकेश्वर ता.किनवटची उपशाखा असून उनकेश्वरला येणारे भाविक पाचोंदा येथे हमखास येतात़ या तीर्थ्२ाक्षेत्राचा विकास करुन या तीर्थक्षेत्राला जुने वैभव मिळवून देण्याची गरज आहे़ यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा़- गौतम महामुने, उपसरपंच, पाचोंदा

टॅग्स :NandedनांदेडReligious Placesधार्मिक स्थळेGovernmentसरकार