शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:19 IST

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण ८ लाख २४ हजार ८२० हेक्टर क्षेत्र असून गतवर्षी ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झाली होती़ त्यात यंदा ३ हजार हेक्टरची वाढ होवून जवळपास ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला असून त्यानुसार बी-बियाणे, खताचे नियोजन केले जात आहे़

ठळक मुद्देकृषी विभागाचे नियोजन : खत,बी-बियाणांचा तुटवडा भासणार नाही

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण ८ लाख २४ हजार ८२० हेक्टर क्षेत्र असून गतवर्षी ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झाली होती़ त्यात यंदा ३ हजार हेक्टरची वाढ होवून जवळपास ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला असून त्यानुसार बी-बियाणे, खताचे नियोजन केले जात आहे़गतवर्षी बोंडअळीमुळे उत्पन्नात झालेली घट आणि अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाल्याने यंदा बरेच शेतकरी कापूस लागवड घटवून सोयाबीन, हळद आणि इतर पिकांना प्राधान्य देतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे़ कृषी विभागाने यंदा कापसाचे लागवड क्षेत्र अडीच लाख हेक्टर प्रस्तावित केले आहे़ गतवर्षी २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर होते़सोयाबीन, तूर पेरा क्षेत्र आहे तेच राहील़ परंतु, ज्वारीच्या पेऱ्यात दुपटीने वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे़ ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १२ हजार ३४४ हेक्टर असून यंदा १ लाख १०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी होईल़ गतवर्षी ६१ हजार ४९८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती़ तर ३ लाख १८ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरा होईल़ गतवर्षी ३ लाख १७ हजार ९५७ हेक्टरवर पेरा झाला होता़ त्यात केवळ ४३ हेक्टरची वाढ प्रस्तावित केली़ यंदा ६२ हजार ८०० हेक्टरवर तूर पीक प्रस्तावित आहे़ तसेच तृणधान्य १ लाख ३ हजार १०० हेक्टर, कडधान्य १ लाख २७ हजार ८००, इतर ६ हजार ३०० हेक्टर तर कापूस अडीच लाख हेक्टरवर, अशी एकूण ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर यंदा खरीप पेरणी होईल़ कृषी विभागाने अजित १५५- अडीच लाख पाकिटे, भक्ती, मल्लिका - दीड लाख पाकिटे, कावेरी कंपनीचे जादू, जॉकपॉट, एटीएम- दीड लाख पाकिटे, राशी कंपनीचे अडीच लाख पाकिटे, अंकुर-१ लाख पाकिटे, मोन्सेंटो, ब्रह्मा-५० हजार पाकिटे, बायर फस्ट क्लास-५० हजार, युवा बिनधास्त - ५० हजार, डॉ़ डॉ़ ब्रँड ७३५१-५० हजार पाकिटे, विठ्ठल-५० हजार तर इतर कंपन्यांची ६८ हजार अशा एकूण १२ लाख ५३ हजार पाकिटांची मागणी प्रस्तावित आहे़ प्रस्तावित ३ लाख १८ हजार हेक्टरवरील सोयाबीन पेºयासाठी सार्वजनिक ५४ हजार तर खाजगी २३ हजार ९१० क्विंटल असे एकूण ७७ हजार ९१० क्विंटल बियाणाची मागणी आहे़कृषी विभागाने खरिपासाठी कापूस बियाणांच्या १२ लाख ५३ हजार पाकिटांची मागणी केली़ यात बीटी कापूस १२ लाख १८ हजार, नॉन बीटी १० हजार तर सुधारित वाणाच्या २५ हजार पाकिटांचा समावेश आहे़एचटीबीटी कापूस बियाणांची लागवड झाल्याने यवतमाळसह राज्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले़ सदर बियाणांचा पुरवठा आंध्र्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात राज्यांतून झाल्याचेही समोर आले होते़ या हंगामात एचटीबीटी बियाणे अवैधरित्या शेतकºयांपर्यंत पोहोचणार नाही याकरिता कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १६ अशा एकूण १७ भरारी पथकांची स्थापना केली आहे़शेतकºयांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बी-बियाणे खरेदी करावे, दुकानदाराची स्वाक्षरी असलेल्या पक्क्या पावत्या घ्या, पावती आणि वेस्टन, पिशवी, टॅग व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे़ सीलबंद, मोहरबंद असलेली पाकिटे खरेदी करावीत, पाकिटावरील अंतिम मुदत पहावी, छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ़ टी़ एस़ मोेटे, जि़ प़ चे कृषीविकास अधिकारी पंडित एस़ मोरे यांनी केले आहे़

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस