शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीच्या १९१ कामांना अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:26 IST

ग्रामीण भागातील स्मशानभुमीच्या दुरावस्थेचा मुद्दा मागील काही वर्षापासून ऐरणीवर आहे. अखेर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : जनसुविधा योजनेतून ग्रामीण भागाला मोठा दिलासा

नांदेड : ग्रामीण भागातील स्मशानभुमीच्या दुरावस्थेचा मुद्दा मागील काही वर्षापासून ऐरणीवर आहे. अखेर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधाअंतर्गत जिल्ह्यातील १९१ स्मशानभूमीच्या कामाला प्रशासनाने मंजुरी दिली असून ही सर्व कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.ग्रामीण भागातील स्मशानभूमीचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येतो. कुठे शेड नाही तर कुठे सांगाडा नाही. कुठे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही तर काही ठिकाणी जागा उपलब्ध असूनही स्मशानभूमीच्या कामासाठी निधी मिळत नसल्याच्या जिल्ह्यातील अनेक गावांच्या तक्रारी होत्या. विविध बैठकामध्येही स्मशानभूमीच्या विकासासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात सुविधांअभावी ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील १९१ स्मशानभूमीच्या कामांना मिळालेली मंजुरी महत्वपूर्ण आहे.जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजना सर्वसाधारणमधून ग्रामपंचायतीला जनसुविधा पुरविणे अंतर्गत निधी देण्यात येतो. सन २०१८-१९ साठी जिल्हा परिषदेच्या निधीतून सुमारे ८ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मधून १४० स्मशानभूमींची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून स्मशानभूमींच्याच कामांसाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून ५१ स्मशानभूमीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.अशी होणार तालुकानिहाय कामेजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून सन २०१८-१९ या वर्षासाठी ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरविणे अंतर्गत १९१ स्मशानभूमीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात अर्धापूर तालुक्यात २०, उमरी तालुक्यात ३, कंधार तालुक्यात १८, किनवट-१९, देगलूर-१४, धर्माबाद-४, नांदेड-१८, नायगाव तालुक्यात ७, बिलोली-६, भोकर- १४, माहूर-८, मुखेड-१४, मुदखेड-६, लोहा-१४, हिमायतनगर- १० तर हदगाव तालुक्यात १६ स्मशानभूमीच्या कामांना मंजुरी मिळाली असून या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील पदाधिकारी स्मशानभूमी विकासासाठी आग्रही होते. या अनुषंगाने १९१ स्मशानभूमीच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी साधारण १४ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे.- अशोक काकडे (मुख्य कार्यकारी अधिकारी)

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद