शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

नांदेड शहरातील ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:36 IST

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांची ओरड होत असून आता महापालिकेच्या स्थायी समितीने ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंजुरी दिली आहे़

ठळक मुद्देस्थायी समितीचा निर्णय : पाच कोटींचा येणार खर्च

नांदेड : गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांची ओरड होत असून आता महापालिकेच्या स्थायी समितीने ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नांदेडकरांना या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे़शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळणी झाली आहे़ खड्डा नसलेला एकही रस्ता दिसून येत नाही़ मुख्य चौकातही खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते़ त्यात अनेकांना खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार झाले आहेत़ परंतु खड्डे बुजविण्यासाठी मनपाकडेही निधी नसल्याची ओरड होत होती़ त्यात शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ यामध्ये रेल्वेस्टेशन ते वजिराबाद पोलीस चौकी-गुरुद्वारा गेट क्रमांक १ ते वेळी मार्केट-बर्की चौक रस्ता क्रमांक १ ते ४, मुथा चौक ते जुना मोंढा टॉवर-बर्की चौक ते देगलूर नाका, गुरुद्वारा परिक्रमा-२, गांधी पुतळा ते महावीर चौक, वजिराबाद रोड ते बंदाघाट, सावरीकर बिल्डींग ते नावघाट, देगलूर रोड ते केळी मार्केट, सिडको-हडको भागातील मुख्य डांबरी रस्ते दुरुस्त करणे, छत्रपती चौक ते रेस्ट हाऊस, शिवाजी पुतळा ते देगलूर रोड, भाग्यनगर टी पॉर्इंट ते व्हीआयपी रोड-रेल्वेस्टेशन, हिंगोली गेट ते एमजीएम कॉलेज, डीएड कॉलेज रोड, फुले मार्केट ते पावडेवाडी नाका, औद्योगिक वसाहत रस्ते, बाबानगर एसटीडी ते रुपा गेस्ट हाऊस, शिवाजीनगर ते डॉक्टर लाईन- लालवाडी, हिंगोली गेट स्लीप रोड आणि दक्षिण उत्तर, देगलूर रोड ते चौफाळा, अ‍ॅक्सीस बँक ते खडकपूरा, आय़जी़आॅफीस ते लातूर रोड, चुना भट्टी रस्ता, दरबार मस्जीद ते नावघाट, वर्कशॉप ते मुथा चौक, मुथा चौक ते गोवर्धन घाट ब्रिज-लातूर रोड, गुरुद्वारा परिसरातील सर्व रस्ते, हिंगोली गेट ते चिखलवाडी चौक, रस्ता क्रमांक २४ ग्यानमाता शाळा ते देगलूर रोड, भगतसिंग रोड ते बाफना ते नवीन पूल, लातूर रोड ते दूधडेअरी, विमानतळ सांगवी ते छत्रपती चौक, शिवाजीनगर ते नसरतपूर, वर्कशॉप टी पॉर्इंट ते नागार्जुना हॉटेल, व्हीआयपी रोड, आनंदनगर चौक ते महादेव दाल मिल, गोकुळनगर चौक ते एमएसईबी आॅफीस, मालेगाव रोड, दीपनगर पाटी ते ज्ञानेश्वरनगर, ज्योती टॉकीज रोड, महाराणा प्रताप चौक ते बाफना, रेल्वेस्टेशन ते देगलूर नाका, दबकपूल ते संगत साहिब गुरुद्वारा, लातूर रोड पोलीस चौकी ते रविनगर चौक, गांधी विद्यालय ते बडी दर्गाह, सराफा रस्ता ते नगरेश्वर मंदिर व मुनवरा मस्जीद ते अमिन कच्ची या रस्त्यांचा समावेश आहे़ या रस्त्यांसाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च लागणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा