नांदेडमध्ये मागील दोन दिवसांपासून अँटिजन टेस्ट बंद आहेत. अँटिजन तपासणीच्या किट संपल्याने तपासण्या बंद असल्याचे सांगण्यात आले. नांदेड महापालिका हद्दीत एकूण १९ ठिकाणी तपासणी केंद्र आहेत. या सर्वच केंद्रांत मागील दोन दिवसांपासून अँटिजन तपासण्या होत नाहीत. सध्या दोन दिवसांपासून आरटीपीसीआर तपासण्या केल्या जात आहेत; पण आरटीपीसीआरचा रिपोर्ट यायला किमान दोन दिवसांचा अवधी लागतो, तर अँटिजन टेस्टचा रिपोर्ट १५ ते २0 मिनिटांत येतो. किट संपल्याने तपासणी आणि त्याचा रिपोर्ट यायला उशीर होत असल्याने रुग्णांना उपचारासाठी देखील विलंब होत आहे. दरम्यान, अँटिजन किट रविवारी सायंकाळीपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे पालिका आयुक्त सुनील लहाने यांनी सांगितले. अँटिजन बंद असले तरी आरटीपीसीआरच्या तपासण्या मात्र सुरू आहेत. टेस्टिंगमध्ये काहीच अडथळा आला नसल्याचे आयुक्त म्हणाले. नांदेडमध्ये रोज 5 हजारांहून अधिक तपासण्या केल्या जात होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ४ हजार तपासण्या होत आहेत.
दोन दिवसांपासून अँटिजन तपासण्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST