शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गेन बिटकॉईनच्या अमित भारद्वाजला सात दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:02 IST

गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकरांना जवळपास 100 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देनांदेड मध्येच शिक्षण घेतलेल्या अमित भारद्वाज याने स्वतःची गेन बिटकॉईन ही कंपनी स्थापन केली होतीपुणे पोलिसांकडून बुधवारी या दोघांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

नांदेड : गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकरांना जवळपास 100 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांकडून बुधवारी या दोघांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

व्हर्चुअल करन्सी म्हणजेच अदृश्य चलनाच्या मायाजालात देशभरातील अनेक जण अडकले आहेत. नांदेड मध्येच शिक्षण घेतलेल्या अमित भारद्वाज याने स्वतःची गेन बिटकॉईन ही कंपनी स्थापन केली होती. आपल्या ओळखीचा फायदा घेत त्याने नांदेडमध्ये अनेक जणांकडील बिटकॉईन घेतले. त्याबदल्यात आकर्षक व्याज देण्याचे आमिष त्याने दिले होते. अशाप्रकारे नांदेड मधून त्याने तब्बल १७५  बिटकॉईन गोळा केले होते. सुरवातीला काही जणांना परतावाही दिला. परंतु, त्यानंतर त्याने परतावा देण्याच्या बदल्यात बाजारात अतिशय कमी मूल्य असलेले एम कॅप हे चलन गुतवणूकदारांना दिले. 

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर एका प्राध्यापकाने या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात तक्रारींचा ओघ वाढतच गेला. नांदेड मध्ये आतापर्यंत अमित भारद्वाज याने ५ लाख रुपये किमतीचे तब्बल १७५ बिटकॉईन गुंतवणूकदरकडून घेतले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारद्वाज याला दिल्ली विमानतळावर पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी भारद्वाज याच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. 

याप्रकरणी नांदेड पोलिसांनी त्याचा ताबा मागितला होता. बुधवारी अमित भारद्वाज व हेमंत सूर्यवंशी यांचा ताबा मिळाल्यानंतर या दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते . न्या एस एस तोडकर यांनी दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Courtन्यायालयArrestअटकNanded policeनांदेड पोलीसfraudधोकेबाजी