शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हौशी नाट्य राज्य स्पर्धा : 'माणसाळलेली रात्र'ने केले अवयवदानाविषयी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:27 IST

नाटकाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे जनजागृती करता येऊ शकते, हे माणसाळलेली रात्र या नाटकाने दाखवून दिले़ अवयवदानाविषयी संदेश त्यांनी दिला़ 

नांदेड : नाटक हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते समाज प्रबोधनाचेही माध्यम आहे. अनेक नामवंत लेखक, रंगकर्मींनी नाटकातून समाजप्रबोधनाचे धडे दिले आहेत़ आणि या माध्यमातून त्या-त्या वेळच्या समस्या, अडचणींवर मात करण्याचे बळ दिले़ याचा सकारात्मक प्रतिसादही दिसत आला आहे. काळानुरूप लोकांचे विचार बदलले असले तरी आपल्या आजूबाजूस नवीन वेगवेगळ्या समस्या, प्रश्न उभे राहतात़ या प्रश्नावरही नाटकाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे जनजागृती करता येऊ शकते, हे माणसाळलेली रात्र या नाटकाने दाखवून दिले़ अवयवदानाविषयी संदेश त्यांनी दिला़ 

परभणीच्या प्रबोधन सेवाभावी संस्थेने सादर केलेले हे नाटक उदय कातनेश्वरकर यांनी लिहिलेले असन अनुजा डावरे यांनी दिग्दर्शित केले आहे़  हे संपूर्ण नाटक एका स्मशानभूमीत घडते़ स्मशानभूमीतील मसणजोगी (उदय कातनेश्वरकर ) याच्याशी विविध आत्मे थेट बोलत असतात. त्या ठिकाणी एक भुरटाचोर बाबल्या (भरड क्षिप्रसाधन) येतो़ त्याला स्मशानभूमीत जळत असलेल्या एका शवावरील दागिना लांबवायचा असतो़ या चोराचा भाऊ अपंग असतो़  त्याच्या दवाखान्यासाठी त्याला पैसे हवे असतात़ परंतु ज्याच्यासाठी त्याला पैसे हवे असतात, तो मयत झालेला असतो याची या चोराला माहीती नसते.

दरम्यान याच स्मशानभूमीत कार अपघातात मयत झालेली निलू (ऐश्वर्या डावरे) येते़ या निलून९ आपले स्वत:चे अवयव दान केलेले असतात. अशा पद्धतीने स्मशानभूमीत मसनजोग्यासह भुरटा चोर बाबल्या आणि मयत निलू एकत्र येतात़ या तिघांचेही विचार अतिशय भिन्न असतात़ मसनजोग्यास माणूस खूप दुष्ट आहे असे वाटत असते़ तर बाबल्याचा माणसावर विश्वास असतो़ तर निलूचे मत आणखीनच वेगळे असते़ माणूस कसाही असो, आपण आपल्या पद्धतीने चांगला विचार केला पाहिजे अशी ती सांगत असते़ या तिघांतील याच विषयावरील चर्चेतून मसनजोग्याचेही मत परिवर्तित होते़ 

संपूर्ण नाटकात दिग्दर्शकाचे काम उठून दिसते़ ऋग्वेद कुलकर्णी या बाल कलावंताने साकारलेली भूमिकाही लक्षवेधी ठरली आहे़ तर भरड क्षिप्रसाधन, उदय कातनेश्वरकर, ऐश्वर्या डावरे, संकेत पांडे यांनीही आपआपल्या भूमिकेस न्याय दिला आहे़  नाटकाचे नेपथ्य संकेत पांडे आणि संजय कातनेश्वरकर यांनी साकारले तर दिगंबर दिवाण यांची प्रकाश योजना सत्याचा आभास निर्माण करणारी होती. उषाताई डावरे यांनी रंगभूषा व वेशभूषेची बाजू सांभाळली तर संगीत उपेंद्र दुधगावकर आणि मंदार कातनेश्वरकर यांनी साकारले़ दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सरस्वती प्रतिष्टान, नांदेडच्या वतीने राजेंद्र पोळ लिखित, सुहास देशपांडे दिग्दर्शित वारूळ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

टॅग्स :artकलाNandedनांदेड