शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

'सन्मानाने जगता यावं म्हणून अर्ज केला, आता यश यावं'; तृतीयपंथी ‘भीमा’ला व्हायचंय तलाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 18:21 IST

सार बळ एकवटल अन अर्ज केला, परीक्षेची केली जोरदार तयारी, नांदेड जिल्ह्यातून पहिल्या तृतीयपंथीचा अर्ज दाखल

- अविनाश पाईकराव नांदेड : ज्या घटकाला समाजाने वेगळ्या दृष्टिकोतून पाहिले, ज्यांनी आजवर टाळ्या वाजवत पैसे मागण्याचे काम केले, तेच तृतीयपंथी आता वेगळा मार्ग निवडताना दिसत असून, नांदेडच्या भीमाशंकर कांबळे या तृतीयपंथीने तलाठी पदासाठी जिल्ह्यातून पहिला अर्ज दाखल करीत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यापूर्वी पोलिस भरती प्रक्रियेतदेखील एका तृतीयपंथीने पोलिस शिपाई पदासाठी अर्ज दाखल केला होता.

समाजातील उपेक्षित घटक असलेल्या तृतीयपंथीनीदेखील मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड सुरू केली आहे. राज्य सरकारकडून त्यांना विविध योजना, नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असताना सिडको भागात राहणाऱ्या भीमाशंकर व्यंकटराव कांबळे (२९) या तृतीयपंथीनीही तलाठी पदासाठी अर्ज दाखल करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. भीमाने दहावीचे शिक्षण हे गणपतराव मोरे विद्यालय किवळा येथून तर बारावीचे शिक्षण सिडकोतील इंदिरा गांधी ज्युनियर कॉलेजधून घेतले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी पदवीचे शिक्षण हे मुक्त विद्यापीठातून घेतले. मात्र पुढे त्यांच्या घरच्यांना ते तृतीयपंथी असल्याचे खटकत होते. सततचा त्रास अन् वादाला कंटाळून भीमाने घर सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर तो तृतीयंपथी गुरुसोबत टाळ्या वाजवत लोकांना पैसे मागण्याचे काम करू लागला. अभ्यासात हुशार असल्याने त्याच्या गुरूंनी त्याला नोकरी करण्यासाठी प्रेरित केले. मागच्या दोन वर्षांपासून भीमा स्पर्धा परीक्षेची तयारीदेखील करत आहे. 

रविवारी आहे परीक्षादरम्यान, तृतीयपंथींसाठी काम करणाऱ्या कमल फाउंडेशनने त्याला तलाठी भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून शेवटच्या दिवशी तृतीयपंथी प्रवर्गातून जिल्ह्यातील तलाठी पदासाठीचा पहिला अर्ज दाखल करून घेतला. रविवारी याच तृतीयपंथी भीमाची तलाठी भरतीच्या परीक्षेचा पेपर आहे. त्यामुळे आता तृतीयपंथी भीमा जर तलाठी झाला तर त्याचा प्रवास अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

स्वावलंबी होण्याचा प्रयत्न किती दिवस टाळ्या वाजवत भीक मागण्याचे काम करणार? या कामामुळे लोक आम्हाला हिणवतात. आम्हालाही समाजात ताठ मानेने, सन्मानाने जगता यावे. यासाठीच नोकरीचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. माझ्यासारख्या इतरांनीही स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा.- भीमाशंकर कांबळे, तृतीयपंथी परीक्षार्थी

टॅग्स :NandedनांदेडRevenue Departmentमहसूल विभाग