शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

माहुरातील पाचही रुग्णवाहिका आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:31 IST

तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांतून प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना माहूरला रेफर केले जाते. त्या रुग्णांना आणणाऱ्या पाचही रुग्णवाहिका वयोवृद्ध झाल्याने रुग्णांना माहूरला येईपर्यंत मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. येथे आल्यानंतर ही वाहने दुकान थाटून बसत असल्याने दुर्घटना घडण्याआधी पाचही रुग्णवाहिका बदलण्याची मागणी होत आहे़

ठळक मुद्देरुग्णांचे हाल : दाखल रुग्णांपेक्षा रेफरचीच संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांतून प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना माहूरला रेफर केले जाते. त्या रुग्णांना आणणाऱ्या पाचही रुग्णवाहिका वयोवृद्ध झाल्याने रुग्णांना माहूरला येईपर्यंत मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. येथे आल्यानंतर ही वाहने दुकान थाटून बसत असल्याने दुर्घटना घडण्याआधी पाचही रुग्णवाहिका बदलण्याची मागणी होत आहे़येथील ७५ टक्के नागरिक शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात़ गोरगरीब जनतेला वेळेवर व विनाशुल्क आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी तालुक्यातील आष्टा, वाईबाजार, सिंदखेड, वानोळा, ईवळेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले़ येथे प्राथमिक उपचाराचीच व्यवस्था असल्याने इमरजन्सी रुग्णांना दर्जेदार सेवा वेळेवर मिळावी, यासाठी पाचही ठिकाणी रुग्णवाहिका या नावाखाली पाच टाटा सुमो कंपनीच्या जुन्या कालमर्यादा संपलेल्या रुग्णवाहिका देण्यात आल्या़ या पाचही ठिकाणावरून माहूरला येण्यासाठी रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे माहूरला येईपर्यंत अनेक ठिकाणची वाहने दुकाने थाटत असल्याने अनेकवेळा रुग्णांना दुसºया वाहनाने माहूर गाठावे लागले.मोठ्या प्रमाणात प्रसूतीचे रुग्ण रेफर होत असताना या पाचही गावांत अनेक वर्षांपासून मागणी असूनही प्रसूतीकक्षाची निर्मिती करण्यात आली नाही़ रेफर लेटर देण्यापुरते प्राथमिक आरोग्य केंद्र राहिले. प्रसूती रुग्ण सरळ माहूरला पाठविले जात असल्याने रुग्णांचा प्राथमिक आरोग्य सेवेतील विश्वास उडाला आहे़ त्यातल्या त्यात खिळखिळ्या रुग्णवाहिकांना रुग्णासाठी कुठल्याच सुविधा नाहीत़ उलट प्रसूतीच्या रुग्णांना आदळआपट करून आणण्यात येत असल्याने ‘पुन्हा याने प्रवास नको रे’ म्हणून हात जोडण्याची वेळ येते़---माहूरच्या ग्रामीण रुग्णालयापासून आष्टा १० कि़मी़, वाईबाजार १५ कि़मी़, सिंदखेड २५ कि़मी़, वानोळा २८ कि़मी़, ईवळेश्वर २० कि़मी़ अंतर असून या सर्व प्रा़आ़ केंद्रात दिवसभरात एक हजारांवर रुग्ण उपचार घेतात़ तर साथरोग काळात हा आकडा दोन हजारांवर जातो़ तर माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात मे महिन्यात ५०० रुग्णांची नोंद ओपीडीत झाली नाही़ तर प्रसूतीचे ४२ रुग्ण दाखल झाले असून यापैकी ६९ रुग्ण माहूरवरून यवतमाळ, पुसद व इतर ठिकाणी रेफर करण्याचा सल्ला दिला जातो़

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटल