शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

माळेगावात अहिल्यागड उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:34 IST

भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याने श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबाराया येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही

ठळक मुद्देधनगर आरक्षण ललकार महामेळाव्यात सक्षणा सलगर यांची घोषणा

माळाकोळी : भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याने श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबाराया येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन धनगर समाजाच्या ज्येष्ठ नेत्या तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी माळेगाव येथील धनगर आरक्षण महामेळाव्यात केले. यावेळी त्यांनी पुढील वर्षी माळेगावात अहिल्यागड उभारणार असे जाहीर केले.कार्यकमास आ.रामराव वडकुते ,माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, कार्याध्यक्ष दत्ता पवार , प्रांजली रावणगावकर, जि. प. सदस्य डॉ. विजय धोंडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.रविवारी श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबारायाच्या यात्रेत भाजपाने धनगर आरक्षण जागर महामेळाव्याचे तर राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षण ललकार महामेळाव्याचे आयोजन केले होते. भाजपाकडून राज्याच्या मंत्री ना.पंकजा मुंडे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. तर राष्ट्रवादीच्या वतीने खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ऐनवेळी खा. सुप्रिया सुळे यांचा दौरा रद्द झाल्याने त्यांच्या ठिकाणी धनंजय मुंडे येणार असल्याचे घोषित केली होते. ना. पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते; पण धनंजय मुंडे यांनीही धनगर समाज महामेळाव्यात काढता पाय घेतल्याने धनगर समाजाच्या आक्रमक नेत्या सक्षणा सलगर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून भाजपा सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्या म्हणाल्या, सत्तेत नव्हतात तेव्हा तुम्हाला धनगरांचा पुळका होता. धनगर समाजाला आरक्षण देऊ असे म्हणून तुम्ही राज्याची सत्ता काबीज केली़ मात्र गेली चार वर्षांत भाजपा सरकारने धनगरांची उपेक्षाच केली. तुम्हाला धनगर समाजाने आरक्षणासाठी मते दिली होती़ तुम्ही धनगर समाजाचा विश्वासघात केलात. माळेगावचा जागृत खंडोबाराया तुम्हाला कधीच माफ करणार नाही. येत्या निवडणुकीत खंडोबाराया भाजपचा खेळखंडोबा करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी माळेगाव यात्रेत अहिल्यादेवी होळकर यांचा अहिल्यागड उभारणार अशी ग्वाही त्यांनी दिली.माजी आ. शंकर अण्णा धोंडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :NandedनांदेडDhangar Reservationधनगर आरक्षणReligious programmeधार्मिक कार्यक्रम