शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यानंतरही नोकर भरतीतील सुत्रधार मोकळेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:41 IST

नोकर भरती घोटाळा प्रकरणी पालिकेच्या तत्कालिन मुख्याधिकाऱ्यासह १५ जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल झाला. तीन महिने झाले गुन्हा दाखल होवून, आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राजेश वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : नोकर भरती घोटाळा प्रकरणी पालिकेच्या तत्कालिन मुख्याधिकाऱ्यासह १५ जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल झाला. तीन महिने झाले गुन्हा दाखल होवून, आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नगर परिषदेत सन १४-१५ मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी, तत्कालीन अध्यक्ष व कर्मचा-यांनी संगनमताने पालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची ८ पदे नियमांना डावलून भरती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका अरुणा देशमुख यांनी करून प्रकरण येथील न्यायालयात दाखल केले होते. यावर न्यायालयाने १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिल्यावरुन भोकर पोलिसात २२ जून २०१८ रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर ३ महिने उलटूनही यातील मुख्य आरोपींना अटक करण्यात यश मिळालेले नाही़ त्यामुळे सदर प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. भोकर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत समावेश झाल्यानंतर आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने ११ फेब्रुवारी २०१० रोजी काढलेल्या अद्यादेशानुसार नगर परिषदेच्या आस्थापनेवरील आकृतिबंधास काही अटींवर मान्यता देण्यात आली होती. या अद्यादेशाच्या आधारे तत्कालीन मुख्याधिकारी राहूल वाघ यांनी सन २०१४-१५ मध्ये पालिकेच्या अग्निशमन दलाकरीता ४ फायरमन व ४ शिपाई असे एकूण ८ चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची भरती केली होती. याकरिता एका वृत्तपत्रातून जाहिरात दिली होती. नियमाप्रमाणे सदर जाहिरात रोजगार समाचारमध्ये प्रकाशित होणे आवश्यक होते. तसेच सरळसेवा भरती प्रक्रिया करण्या अगोदर जिल्हाधिकारी यांची मान्यता घेण्याच्या अद्यादेशातील अटीला गांभीर्याने घेतले नाही. यासोबतच जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार समिती, जिल्हा समाजकल्याण कार्यालयांनी शिफारस केलेल्या उमेदवारांची निवड करण्यात यावी असेही आदेशात म्हटले होते. यातील आरक्षण ३० टक्के महिलांसाठी, १५ टक्के माजी सैनिकांसाठी, ५ टक्के दिव्यांगासाठी आणि ५ टक्के प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी आरक्षित करण्यात यावे असे स्पष्ट नमूद होते. मात्र त्यानंतरही नियम धाब्यावर बसवुन उमेदवारांची निवड केल्याचे पुढे आले होते़

टॅग्स :NandedनांदेडEmployeeकर्मचारीfraudधोकेबाजी