यंत्राने घेतला पेट
मुदखेड- येथील अहिल्यादेवी होळकर चौकात मुदखेड-माळकौठा रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करणाऱ्या यंत्राने पेट घेतला. आकस्मिक ही आग लागली. यावेळी शेजारी सीआरपीएफ केंद्रातील पाण्याचे टँक, यंत्र घटनास्थळी आणून आग विझविण्यात आली.
तरुणाची आत्महत्या
मुक्रमाबाद - येथील जेसीबीचालक सतीश आनंदा फुले (वय ३६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. १५ दिवसांपूर्वी ते जेसीबीमालक उमेश केसरकर यांच्यासह या भागात आले होते. अमित गायकवाड यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन फुले यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळले नाही. मुक्रमाबाद पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
तालुकाध्यक्षपदी मोरे
कंधार- राष्ट्रवादी युवक काँग्रेस कंधार तालुकाध्यक्ष माधव पाटील-मोरे यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी ही निवड जाहीर केली. या निवडीबद्दल मोरे यांचे अनेकांनी स्वागत केले.
राठोड यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
देगलूर - प्राचार्य शंकर राठोड-हाणेगावकर यांची भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. खा. प्रताप पाटील-चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील-गोजेगावकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. या नियुक्तीबद्दल अनेकांनी त्यांचे स्वागत केले.
लक्ष्मीमंदिराचे भूमिपूजन
उमरी- येथील पहाड गल्ली येथे १८ फेब्रुवारी रोजी श्री लक्ष्मीमंदिराचे भूमिपूजन घोडजकर महाराज यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कैलास देशमुख-गोरठेकर, निखिल देशमुख, सदानंद खांडरे, अनुसया कटकदवणे, इरबा शेळके, बद्री मदने, अनंत राखे, शंकरराव मदने, साईनाथ पेरेवार, गणेशराव पेरे, आदी उपस्थित होते.
शिवजन्मोत्सव साजरा
उमरी - येथील हनुमान गल्ली परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली. लीलाबाई हामंद व अंजनाबाई खांडरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी संगीता पेरेवार, वंदना शिंदे, सजनी कौर-टाक, शकुंतला अरगुलवार, कमलाबाई शिंदे, शकुंतला धात्रक, शोभा शिंदे, आदी उपस्थित होते.
हरभऱ्याचे नुकसान
नरसी- नरसी, नरसीतांडा, होटाळा, धानोरा, चांडोळा, खंडगाव, मरवाळी, मरवाळी तांडा, गडगा हिप्परगामळ येथील पिकांचे दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. अनेकांनी हरभरा कापणीपूर्व मळणी यंत्राने काढून घरी नेण्यासाठी सुरक्षितस्थळी ठेवले होते. मात्र पावसाने घात केला. हरभरा भिजून मोठे नुकसान झाले.
सरपंचपदी तवर
हदगाव- तालुक्यातील कंजारा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रदीप तवर यांची निवड झाली; तर उपसरपंचपदी अश्विनी कदम यांची निवड झाली. पॅनल प्रमुख रामराव तवर यांची सत्ता सलग पाचव्यांदा आली. सरपंच तवर हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत.