नांदेड - भरधाव वेगात दुचाकीवर फटाके फोडणे, कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजविणे यातून शहरात धुमाकूळ घालणाऱ्या ७९ बुलेटसह १३९ वाहनांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. यातील काही वाहने तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत. शहरात दुचाकीच्या सायलेंसरमध्ये बदल करुन फटाक्याचा आवाज करणाऱ्या दुचाकी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत. त्याचा लहान मुले आणि वृद्धांना त्रास होत आहे. या प्रकाराची दखल घेऊन पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शहर वाहतूक शाखेने वेगवेगळ्या भागात कारवाई करुन ७९ बुलेटसह १३९ वाहने जप्त केली आहेत. तसेच दंडात्मक कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वाहन निरीक्षक मेघल अनसाने, निरंजन पुनसे व अन्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी वाहतूक शाखेला भेट देत जप्त केलेल्या वाहनांची तपासणी केली.
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १३९ दुचाकींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:27 IST