शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अभिजीत राऊत नांदेडचे नवे जिल्हाधिकारी, तर मनपा आयुक्तपदी भागवतराव पाटील

By प्रसाद आर्वीकर | Updated: September 30, 2022 14:09 IST

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची १८ ऑगस्ट रोजी  नागपूर येथे बदली झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी पद रिक्त होते.

नांदेड :  येथील जिल्हाधिकारीपदी अभिजीत राऊत यांची तर महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ.भागवतराव पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश २९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत. तब्बल दीड महिन्यानंतर  पूर्णवेळ जिल्हाधिकारी मिळाले आहेत. 

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची १८ ऑगस्ट रोजी  नागपूर येथे बदली झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी पद रिक्त होते. नवीन जिल्हाधिकारी कोण? याची उत्सूकता होती. दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्हाधिकारीपदी जळगाव येथील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नियुक्ती झाली आहे. अभिजीत राऊत हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.  त्यांचा प्रशिक्षण कालावधी नंदुरबार येथे पूर्ण झाला. 

तसेच रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी डॉ.भागवतराव नामदेव पाटील यांची नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.भागवतराव पाटील हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.पालकमंत्री अन्‌ जिल्हाधिकारीही जळगावचेच

नांदेड जिल्ह्यासाठी दोन आठवड्यापूर्वीच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. महाजन हे जळगावचे असून त्यांच्या पाठोपाठ  जळगाव येथीलच जिल्हाधिकाऱ्यांची नांदेडला नियुक्त झाले आहेत. त्यामुळे नव्या पालकमंत्र्यांनी जळगाव येथूनच जिल्हाधिकारी आणल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड