शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

एका दुचाकी चोरीच्या तपासात १७ चोरींच्या गाड्या सापडल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2023 20:10 IST

अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड) : हिंगोली, नांदेड जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या अट्टल चोरट्यांना अर्धापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १७ दुचाकीं एकुण रक्कम ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुचाकीसह अनेक गुन्ह्यांचा, आरोपींचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्धापूर पोलिसांच्या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अर्धापूर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील दुचाकी चोरीच्या तपासातून १७ दुचाकी चोरींचा उलगडा झाला असून या कार्यवाही मध्ये जप्त केलेल्या वाहनांची चौकशी केली असता विविध पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोउपनि कपील आगलावे, पोउपनि बळीराम राठोड,आर.एस. नरवाडे, कांबळे, कल्याण पांडे, कोकाटे, भिमराव राठोड, राजु कांबळे, गुरूदास आरेवार, महेंद्र डांगे, घुले,डी.एम.जोशी, पोउपनी वेदपाठक,चापोउपनि बाबुराव जाधव यांनी कामगिरी केली असून पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

नांदेड जिल्हयात तसेच अर्धापूर पोलीस ठाणे हाद्दीत मोटार सायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मा.पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मा. अ.पो.अधीक्षक भोकर खंडेराय धरणे, मा. स.पो.अधीक्षक, उपविभाग नांदेड ग्रा.गोहर हसन व पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. अर्धापूर येथील पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे व त्यांचे पथकाला पो.स्टेल हाद्दीत चोरी गेलेल्या मोटारसायकल व चोरांचा शोध घेण्यासाठी आदेशित केल्याने पोउपनि कपील आगलावे यांनी पो.स्टे अर्धापुर गुन्हा नं.१४०/२०२३ कलम ३७९ भादवि मध्ये चोरीस गेलेली मोटार सायकलची फुटेज व गुप्त खबरीमार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपीचा कसोशीने शोध घेत असताना आरोपी लक्ष्मण मच्छिंद्रनाथ पोटे वय २३ वर्ष व रविराज हिरामण पोगे २६ वर्षे रा. येलकी ता.वसमत जि.हिंगोली व त्यांचा साथीदार तुकाराम उर्फ बबल्या उर्फ पल्लू  लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातुन १७ मोटारसायकल ११ लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणात अनेक मोठ्या टोळीचा व अनेक गुन्ह्यांचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड