शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंध दाम्पत्याचा डोळस आधार हिरावला; अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह आढळला

By शिवराज बिचेवार | Updated: August 19, 2022 20:45 IST

अंध दाम्पत्य रेल्वेत चिप्स विकून करतात उदरनिर्वाह, डोळस चिमुकलीचा होता एकमेव आधार

नांदेड- जन्मताच पती-पत्नी दोघेही अंध. त्यांच्या पोटी जन्मलेली चिमुकली हाच त्यांचा डोळस आधार. तिच्या डोळ्यांनीच हे दाम्पत्य जग पाहत होते. परंतु काळाने तो आधारही हिरावून घेतला. तीन दिवसापूर्वी सायंकाळी घरासमोरुन अपहरण केलेल्या या सहा वर्षीय चिमुकलीचा शुक्रवारी गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

शहरातील तेहरानगर भागात शासकीय संकुलातील इमारत क्रमांक ७ मध्ये गेल्या दोन वर्षापासून अंकुश हट्टेकर आणि शितल हट्टेकर हे अंध दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना पावणे सहा वर्षाची आरोही ही डोळस मुलगी आहे. पती-पत्नी दोघेही अंध असल्यामुळे मुलगी आरोही हाच त्यांचा आधार होती. तिच्या डोळ्यानेच अंध पती-पत्नी जग पाहत होते. परंतु १६ ऑगस्टच्या सायंकाळी घरासमोर खेळत असलेली आरोही अचानक बेपत्ता झाली. अंध दाम्पत्याने इतर नातेवाईकांच्या मदतीने तिचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. परंतु सापडली नाही. रात्री बारा वाजेपर्यंत हे अंध दाम्पत्य आपल्या मुलीचा शोध घेत होते. अखेर दुसर्या दिवशी त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 

पोलिसांनी या भागातील काही नागरीकांची चौकशी करुन संशयिताची चौकशीही केली होती. परंतु त्यानंतरही मुलीचा शोध लागला नाही. त्यात शनिवारी गोदावरी नदीपात्रात या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा मृतदेह आढळल्याची बातमी कळताच अंध दाम्पत्याने टाहो फोडला. अंधाऱ्या आयुष्यात मुलीच्या रुपाने एकमेव असलेला आधारही काळाने हिरावला होता. मयत मुलीवर विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु आहे.

वडील रेल्वेत विकतात पदार्थहट्टेकर दाम्पत्य हे अंध आहे. त्यामुळे उत्पन्नाचे त्यांच्याकडे कोणतेच साधन नाही. त्यामुळे अंकुश हट्टेकर हे रेल्वेत फिरुन चिप्स, कुरेकरे असे पदार्थ विक्री करुन आपली उपजिविका चालवितात. या कामी सहा वर्षीय चिमुकलीही त्यांना मदत करीत होती. परंतु आता तो आधारही हिरावला गेला आहे.

माझ्या लेकीला परत आणापोलिसांनी हट्टेकर दाम्पत्याला मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी टाहो फोडला. आई शितल यांनी माझ्या लेकीला परत आणा म्हणून हंबरडा फोडला. अंध डोळ्यातून अश्रृंच्या धाराचे पाट पाहत होते. त्यामुळे पोलिसांसह उपस्थितांचे ह्दय हेलावून गेले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड