शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून गाळ काढताना कुंडात सापडली 'थ्री नॉट थ्री' ची ९० काडतूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:39 IST

नक्षलवाद्यांनी काडतुसे फेकल्याचा संशय

ठळक मुद्देही काडतुसे २० वर्षापूर्वीची असण्याची शक्यता     ७३ पूर्ण काडतुस तर १७ अर्धवट तुटलेल्या अवस्थेत

श्रीक्षेत्र माहूर (जि़नांदेड) : ग्रामस्थांच्या पुढाकाराने लोकसहभागातून शहरातील मातृतीर्थ कुंड परिसरात गाळ काढण्याचे काम सुरू आहे़ हा गाळ काढताना जागमाता कुंडात ९० काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ ही काडतुसे २० वर्षापूर्वीची असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ 

शहरातील मातृतीर्थ कुंडाकडे जाणाऱ्या रोडवर जागमाता (वृनमोचन कुंड) येथे मागील दीड महिन्यापासून लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे़  कुंडातील १३ पायऱ्या गाळमुक्त झाल्यानंतर बुधवारी १४ व्या पायऱ्याखालचा गाळ उपसण्यात येत असताना सकाळी १०़३० च्या सुमारास  ही काडतूस  सापडली.  काडतूस पाहिल्यानंतर नागरिकांत एकच खळबळ उडाली.

काहींनी या बाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पो़नि़लक्षमण राख यांनी कुंडाकडे धाव घेतली़ यावेळी सर्व काडतूस स्वच्छ करून मोजणी केली असता ७३ पूर्ण काडतुस तर १७ अर्धवट तुटलेल्या अवस्थेतील थ्री नॉट थ्रीचे काडतुस आढळून आले़ ही सर्व ९० काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली असून याचा पंचनामा करण्यात आला़ सदरील काडतुस वरिष्ठांकडे तात्काळ पाठविणार आहेत़ कुंडातील गाळ काढण्याचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू असल्याचे पोलिस निरीक्षकलक्षमण राख यांनी सांगितले़  

नक्षलवाद्यांनी काडतुसे फेकल्याचा संशयआदिवासीबहुल असलेल्या माहूर-किनवट तालुक्यात २० वर्षापूर्वी नक्षली चळवळीचा बोलबाला होता़ या भागातील नक्षलींचा नेता म्हणून ओळख असलेल्या श्यामराव कनाके उर्फ विजयकुमार यास १८ मे १९९२ रोजी जुनापाणी येथे मारण्यात आले़ त्यानंतर या भागातील नक्षली चळवळीची चर्चाही थांबली़  विजयकुमार मारल्या गेल्यानंतर त्याचे साथीदार मात्र फरार झाले़ नक्षल्यांच्या जाण्या-येण्याचा हाच मार्ग असल्याने त्यातल्याच काही जणांनी हा दारूगोळा कुंड परिसरात फेकला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे़ 

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसnaxaliteनक्षलवादी