शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिलोलीतून वाळू उपशापोटी मिळाला ९ कोटींचा महसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:16 IST

मराठवाड्यात सर्वाधिक गौण खनिजचे महसूल मिळवून देणाऱ्या बिलोली तालुक्यातून यावर्षीच्या सहा महिन्यांत वाळू उपशापोटी तब्बल ९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत

ठळक मुद्दे निसर्गाची देण असलेल्या या दोन नदीपात्रात बिलोली तालुक्यात  २० शासकीय घाट आहेत़

- राजेश गंगमवार

बिलोली (नांदेड ) : मराठवाड्यात सर्वाधिक गौण खनिजचे महसूल मिळवून देणाऱ्या बिलोली तालुक्यातून यावर्षीच्या सहा महिन्यांत वाळू उपशापोटी तब्बल ९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत़ जानेवारी ते जून या कालावधीत कारवाईपोटी ४२ लाख रुपये दंड आकारणी झाली आहे़

तालुक्याला मांजरा व गोदावरी नदीचा वेढा आहे़ गोदावरी नदी पात्रातून काळ्या रंगाची तर मांजरा नदीपात्रातून लाल रंगाची वाळू मिळते़ निसर्गाची देण असलेल्या या दोन नदीपात्रात बिलोली तालुक्यात  २० शासकीय घाट आहेत़ कर्नाटक व तेलंगणा सीमेवरील मांजरा नदी पात्रात  त्या शासनाचे शासकीय वाळूघाट आहेत़ या दोन्ही राज्यांत वाळू उपशावर निर्बंध असल्याने बिलोली व देगलूर तालुक्यातील वाळू घाटांना महत्त्व आहे़

यावर्षी पहिल्यांदाच वाळू साठ्यानुसार एका घाटांचे दोन घाट निर्माण करून ई-लिलाव करण्यात आला़ परिणामी  महसूलमध्ये वाढ झाली़ जानेवारी ते जून हा वाळू उपशाचा हंगाम असतो़ पावसाळा सुरू झाला की वाळू उपसा मंदावतो़ पाऊस लांबला तर ठेकेदारांचे चांगभलं होते़ यावर्षी मान्सूनपूर्व व मृग नक्षत्रात मोठा पाऊस झाला़ जूनच्या १५ दिवसांत १६० मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ यावर्षीच्या हंगामात ९ वाळू घाटांचा लिलाव झाला़ प्रत्यक्षात सात  घाटांवरूनच उपसा झाला़ नियमबाह्य वाळू उपशामुळे गोदावरीचे दोन घाट दोन महिन्यांतच बंद झाले़  

२०१८-१९ अंतर्गत कार्ला वाळू घाट ५३ लाख, माचनूर ७७ लाख, सगरोळी ७० लाख, माचनूर वन- ५९ लाख, चिरली ५० लाख, कोळगाव ४८ लाख तर बोळेगाव सव्वाकोटीचा महसूल मिळाला़ सर्व वाळू घाटांतून पकडलेल्या अवैध व नियमबाह्य वाहतुकीवर बिलोली प्रशासनाने कार्यवाही केली़ ज्यामध्ये ४२ लाख रुपये दंड वसूल झाला़  जानेवारी ६० हजार, फेब्रुवारीत ५० हजार, मार्च १५ लाख, एप्रिलमध्ये ९ लाख, मे मध्ये ५ लाख, जूनमध्ये १२ लाख वसूल झाले़ अवैध वाळूसाठा जप्त करण्याची मोठी कार्यवाही कोळगाव शिवारात झाली़ त्या पाठोपाठ अन्य दहा ठिकाणी अशी कार्यवाही झाली़ ज्यामधून २ कोटी ४१ लाख रुपये बिलोली तहसीलला प्राप्त झाले आहेत़ गौण खनिजच्या माध्यमातून यावर्षी सर्वाधिक महसूल मिळाला आहे़

तेलंगणातून मिळणाऱ्या महसुलात घटयावर्षी प्रथमच तेलंगणा शासनाने परराज्यातील वाळू आयातीवर कडक निर्बंध आणले़ बॉर्डर चेकपोस्टवर कडक तपासणी सुरू झाली़ महाराष्ट्रातील वाळू तेलंगणात आल्यावर त्या राज्यातील रॉयल्टी, सेल टॅक्स आकारणी सुरू झाली़ परिणामी वाळू वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे बहुतांश कर्नाटक राज्यात वाळूची वाहतूक झाली़ तेलंगणातील वाळू वाहतुकीवर कडक       निर्बंध नसते तर अन्य शासकीय वाळू घाटांना ठेकेदार मिळाले असते.  सीमावर्ती भागात सगरोळी व माचनूर या घाटांवर तेलंगणा प्रशासनाने वाळू घाटात घुसखोरी केल्याच्या कारणावरून तीन वेळा पोलीस कार्यवाही केली़ मांजराच्या अथांग वाळूघाटात अजूनही मराठवाडा-तेलंगणाची निश्चित सीमा नाही़ वाळूच्या उपशावरून या भागात नेहमी राडा होत आहे़ तेलंगणा प्रशासन यावर्षी सीमावर्ती भागात नेहमीच जागरूक व लक्ष ठेवून होते़ दोन्ही राज्यातील मराठी व तेलगू भाषिकांत वाद झाले आहेत़ 

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड