जिल्ह्यात ७ रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. मयतामध्ये नांदेड भाग्यनगरमधील ६५ वर्षीय पुरुष, शिवाजीनगरातील ७६ वर्षीय पुरुष, उमरीतील ६५ वर्षीय पुरुष, सिडकोतील ५५ वर्षीय महिला, माहूर तालुक्यातील अजनी येथील ६५ वर्षीय पुरुष, वजिराबाद येथील ७० वर्षीय पुरुष आणि नायगाव तालुक्यातील रातोळी येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रविवारी १५५ रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. त्यात विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ८, हदगाव ४, मुदखेड ६, मांडवी ४, अर्धापूर २९, बिलोली १, धर्माबाद ४, लोहा २, किनवट १५ आणि खाजगी रुग्णालयातील २० रुग्ण तसेच मनपा अंतर्गत एनआरआय भवन, जम्बो कोविड सेंटर व गृह विलगीकरणातील ५० रुग्णांचाही कोरोनामुक्त रुग्णांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात १ हजार ६६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ६९ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण नांदेड येथील जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये आहेत. येथे ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयाच्या नव्या इमारतीत ५२, विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३७, बारड कोविड केअर सेंटर १८, किनवट ३३, मुखेड १२, देगलूर २५, भोकर १, नायगाव ६, उमरी ११, माहूर ११, हदगाव ११, लोहा १२, धर्माबाद २८, मुदखेड २२, अर्धापूर १८, बिलोली १८, हिमायतनगर ४, एनआरआय भवन १४, मांडवी २, जम्बो कोविड केअर सेंटर ७ आणि खाजगी रुग्णालयात २६१ रुग्ण उपचार घेत आहेत. गृह विलगीकरणात मनपा अंतर्गत ११५ तर विविध तालुक्यांतर्गत ८९० रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत ८४ हजार ५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर १ हजार ८५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.