शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भोकर तालुक्यातील जि़प़ शाळांच्या ६९ वर्गखोल्या मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:13 IST

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ६९ वर्गखोल्या मोडकळीस आल्याने येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ६९ वर्गखोल्या मोडकळीस आल्याने येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२५ शाळांत ११९९२ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. यातील ४१ शाळेअंतर्गत उपलब्ध वर्गखोल्यांतील ६९ वर्गखोल्या जुने बांधकाम असल्यामुळे पडझड होवून मोडकळीस आल्या आहेत. काही शाळांची टिनपत्रे जीर्ण झाली आहेत. तर काही शाळांच्या छताला गळती लागली आहे. तसेच भिंतीला भेगा पडल्या आहेत. बहुतांश शाळेला संरक्षक भिंत नसल्याने पशुंचा वावर वाढला आहे.अशाही परिस्थितीत येथील कार्यरत शिक्षक एकाच खोलीत दोन किंवा अधिक वर्गाचे विद्यार्थी बसवून अध्यापन करतात. तर काही शाळांत पर्याय नसल्यामुळे मोडकळीस आलेल्या खोलीतच शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे.येत्या शैक्षणिक वर्षात पडझड झालेल्या वर्गखोल्या बांधून विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळा मिळावी अशी अपेक्षा पालक करीत आहेत.याबाबत गटशिक्षणाधिकारी डी.जी.पोहणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात आ.अमिताताई चव्हाण यांनी शाळेच्या इमारतीची व मोडकळीस आलेल्या वर्गखोलीची माहिती मागितली होती. त्यानुसार त्यांना व जिल्हा परिषद शिक्षण विभागास माहिती दिली आहे.वरिष्ठ स्तरावर याबाबत निर्णय होईल.तालुक्यातील ४१ शाळांतील २६, आणि ८ शाळांत २ तसेच ४ शाळांत ३ वर्गखोल्यांची पुनर्बांधणी होणे आवश्यक असून थेरबन येथे ४ व खरबी येथे ६ वर्गखोल्या मोडकळीस आल्यामुळे येथेही पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. तर भोकर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या इमारतीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.हस्सापूर येथे उपलब्ध असलेल्या तीनही वर्गखोल्यांची पडझड झाल्यामुळे येथील मुख्याध्यापक विठ्ठल पुजरवाड यांनी शिक्षण विभागाकडे शाळा बांधकामाची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून इमारत बांधकामाची आवश्यकता असल्याचे पत्र दिले आहे.