शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचे ६० कोटी रुपये अखर्चित -चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:21 IST

जिल्ह्यातील सर्वसाधारण, नावीन्यपूर्ण, आदिवासी आदी विविध योजनांचे २०१८-१९ या वर्षातील तब्बल ६० कोटी रुपये अखर्चित असल्याची धक्कादायक बाब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाली आहे़

ठळक मुद्देदोन महिन्यांत कसा खर्च करणार?

नांदेड : जिल्ह्यातील सर्वसाधारण, नावीन्यपूर्ण, आदिवासी आदी विविध योजनांचे २०१८-१९ या वर्षातील तब्बल ६० कोटी रुपये अखर्चित असल्याची धक्कादायक बाब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाली आहे़ अखर्चित असलेला हा निधी येत्या दोन महिन्यांत कसा खर्च करणार? असा सवाल करीत यासाठी दोषी असलेल्यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़पत्रपरिषदेत खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ १५ तालुक्यांनी नोव्हेंबरमध्येच पाणीटंचाईचा आराखडा पाठविला होता़ परंतु, फेब्रुवारी उजाडत आला तरी, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल नाही़विहीर अधिग्रहण, टँकर यासारख्या उपाययोजनांसाठी अक्षम्य दिरंगाई करण्यात येत आहे़ प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळे उपाययोजना कधी करणार? अन् पाणी उपलब्ध कधी करुन देणार हा खरा प्रश्न आहे़ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नियोजन विभागाच्या बैठकीत तब्बल १७२ ट्रान्सफार्मर बंद असल्याचा खुलासा केला़या ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीचे काय? यावर मात्र अधिकाºयांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत़ विविध योजनांचे तब्बल ६० कोटी रुपये अखर्चित आहेत़ एवढे महिने प्रशासनाने नेमके केले तरी काय? अखर्चित असलेले हे ६० कोटी दोन महिन्यात कसे खर्च करणार? आमच्या काळात पुनर्विनियोजनासाठी २ ते ३ कोटी शिल्लक राहत असत. परंतु यावेळी तब्बल २० कोटी रुपये राहिले आहेत़ त्यामुळे या निधीचा अपहार होण्याची दाट शक्यता आहे़ सर्व महत्त्वाच्या योजनांना बगल देण्यात आली असून हे जिल्ह्यासाठीचे मोठे अपयश असल्याचेही खा़चव्हाण म्हणाले़ त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे चव्हाण म्हणाले़ तर दुसरीकडे अप्पर पैनगंगेचे पाणी पळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ या निर्णयाला आम्ही विरोध दर्शविला आहे़ कारण त्यामुळे नांदेडसह शेजारील जिल्ह्यांचे नुकसान होणार आहे़भाजपा सरकारने साडेचार वर्षांत केवळ थापा मारण्याचेच काम केले आहे़ पुढचे काही महिने तर थापा मारण्याची संख्या आणखी वाढणार असल्याचेही ते म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण