शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस जबाबदार पतसंस्था अध्यक्षास ५ वर्षे सक्तमजुरी; नांदेडच्या सहायक जिल्हा न्यायालयाचा निकाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 17:37 IST

पतसंस्थेतील गुंतवणूकदार यांच्या त्रासाला आणि अध्यक्षांच्या दामदाटीला कंटाळून २०१६मध्ये पतसंस्थेच्या सचिवाने आत्महत्या केली होती़ याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाला नांदेडचे सहायक जिल्हा न्यायालयाने  पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.

नांदेड : पतसंस्थेतील गुंतवणूकदार यांच्या त्रासाला आणि अध्यक्षांच्या दामदाटीला कंटाळून २०१६मध्ये पतसंस्थेच्या सचिवाने आत्महत्या केली होती़ याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाला नांदेडचे सहायक जिल्हा न्यायालयाने  पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे सन २००२ मध्ये भीमराव दुधे आणि लक्ष्मीकांत गोविंदवार यांनी शिवाजी पतसंस्था काढली. या पतसंस्थेचे दुधे हे संस्थापक अध्यक्ष आहेत तर गोविंदवार हे सचिव म्हणून कार्यरत होते. पतसंस्थेचा कारभार उत्कृष्ट सुरु असताना दुधे यांनी २०१२ मध्ये वसंतराव नाईक भाजीपाला संस्था काढून शिवाजी पतसंस्थेतील सर्व पैसे या संस्थेत वर्ग केले. 

दरम्यान, शिवाजी पतसंस्थेतील गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यावरुन गोविंदवार आणि दुधे यांच्यात वाद निर्माण झाला. गुंतवणूकदारांकडून सतत पैशाची होणारी मागणी आणि दुधे यांच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मीकांत गोविंदवार यांनी १६ एप्रिल २०१६ रोजी माहूर येथील दत्तशीखर परिसरात विष प्राशन करुन आत्महत्या केली. 

या प्रकरणात लक्ष्मीकांत गोविंदवार यांचा मुलगा डॉ. अभय गोविंदवार यांच्या तक्रारीवरुन माहूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आत्महत्यासंदर्भातील नोट आणि इतर हस्तलिखित कागदपत्र हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविले.  तपासानंतर माहूर पोलिसांनी भीमराव दुधे यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार या खटल्यात ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. 

याप्रकरणी साक्षीदार तपासून नांदेड येथील सहा़जिल्हा न्यायालयाने लक्ष्मीकांत गोविंदवार यांच्या मृत्यूस भीमराव दुधे जबाबदार असल्याचा निकाल देत त्यास पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी अ‍ॅड. रणजित देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :Courtन्यायालयNandedनांदेड