शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

४१ उमेदवारांची रणांगणातून माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:13 IST

नांदेड लोकसभेसाठी १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. ५५ उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी १० तर दुसऱ्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती मतदानासाठी लागणार एकच इलेक्ट्रॉनिक मशीन

नांदेड : नांदेड लोकसभेसाठी १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. ५५ उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी १० तर दुसऱ्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. उमेदवारांची संख्या १५ पेक्षा अधिक नसल्याने मतदानासाठी आता एकच इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार हा अंतिम दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत ३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. २८ मार्च रोजी १० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. नांदेड लोकसभेसाठी एकूण ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील चार उमेदवारांचे अर्ज छाननीत अपात्र ठरले. ५५ पैकी ३१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघार घेतलेल्या उमेदवारांत अहमद अ. खादर नईम, आरीफ अहेमद, एकबाल अहमद, जुल्फेखान जिलानी सय्यद, तुकाराम बिराजदार, रवींद्र थोरात, आनंद नवघरे, नवीन युनूस खान, प्रकाश घुन्नर, प्रमोदकुमार कामठेकर, अ‍ॅड. मारोतराव हुक्के, मो. मोहिजोद्दीन, राहुल साळवे, लतीफ उल जफर कुरेशी, लतीफखाँ पठाण, विजयमाला गायकवाड, शेख मुनीर, सचिन नवघरे, सय्यद तनवीर, अ‍ॅड. सुभाष जाधव, युसूफखान, लता कांबळे, संभाजी पाटील, विजय कांबळे, अंकुश पाटील, अल्ताफ अहमद, सय्यद मोईन, शिवानंद पांचाळ, श्रीकांत गायकवाड, शेख अफजलोद्दीन आणि पठाण जफर अली खान यांचा समावेश आहे.इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनवर १५ उमेदवारांची नावे व एक मत ‘नोटा’ चे असते. १५ पेक्षा अधिक उमेदवार राहिले असते तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक वोटींग मशीन लावाव्या लागल्या असत्या. त्याची आता गरज उरणार नाही.एकाच मशीनवर मतदान घेता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डोंगरे म्हणाले.याच पत्रकार परिषदेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या माहिती संदर्भिकेचे प्रकाशन निवडणूक निरीक्षक हरदीपसिंघ व निवडणूक निर्णय अधिकारी डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर संदर्भिका अभ्यासकांना तसेच प्रसार माध्यमांना विश्लेषणासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास डोंगरे यांनी व्यक्त केला. या संदर्भिकेत निवडणूक आचारसंहिता, सोशल मीडिया, व्हीव्हीपॅट, मतदान केंद्र संख्या तसेच लोकसभा निवडणुकीतील १९५१ ते २०१४ पर्यंतचे निकाल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, राम गगराणी, लतीफ पठाण, राजेंद्र चव्हाण, डॉ. दीपक शिंदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Nandedनांदेडlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक