शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

३६० जणांना एचआयव्हीची लागण

By admin | Updated: July 28, 2014 00:59 IST

हदगाव : तालुक्यात आयसीटीसी केंद्र २००६ पासून सुरू झाले.

हदगाव : तालुक्यात आयसीटीसी केंद्र २००६ पासून सुरू झाले. तेव्हापासून २५ जुलैपर्यंत १५ हजार नागरिकांनी तपासणी करुन घेतली असून आठ वर्षांत ३६० जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली आहे. तालुक्यात एकूण १४५ गावे असून २ लाख ६० हजार लोकसंख्या आहे. २१ व्या शतकात एचआयव्हीने आपला विळखा चांगलाच पसरविला आहे. या रोगापासून अलिप्त राहण्यासाठी जागतिक पातळीवर मोठी केंद्र सुरू करण्यात आली. विभागीय जिल्हा व तालुका पातळीवर ही केंद्र सुरू झाली. नॅको, (एनसीए), एमएसएस महाराष्ट्र स्टेट सोसायटी, डीएपीसीव्ही जिल्ह्यावर, आयसीटीसी तालुक्यावर ही केंद्र सुरू झाली. गरोदर मातांना ही तपासणी अनिवार्य केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचत आहेत. या रोगाची तपासणी करण्यासाठी मोफत व सोपी पद्धत असूनही नागरिक आपल्या आरोग्याविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या गावात किंवा आजूबाजूला एचआयव्हीबाधित महिला किंवा पुरुष वावरत असून आपले त्यांच्याशी असुरक्षित यौन संबंध किंवा संक्रमित रक्तामधून आपल्या घरी हा रोग येऊ शकतो. त्यासाठी ही तपासणी करुन खात्री करणे गरजेचे असल्याचे डॉ. लोमटे यांनी सांगितले.सध्या युवा पिढी जागरुक झाली असून सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून मार्गदर्शन घेत आहे़ तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत़ यात्रा, प्रदर्शन, महाविद्यालयातूनही रोगाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येतात़ त्यासाठी सामाजिक संस्थाची मदत घेण्यात येते़ एचआयव्ही आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात आली़ या आजाराचे दुष्परिणाम माहित झाल्याने अनेकजण खबरदारी घेतात़ परिणामी एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण घटले आहे़ (वार्ताहर)अशी झाली वर्षनिहाय तपासणीअसुरक्षित यौनसंबंध, संक्रमित रक्त या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. रक्तनिर्मिती करणाऱ्या पेशी नष्ट होवून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती लोप पावते़ तालुक्यात २००९ मध्ये २८१५, २०१०-२४५१, २०११-२९१२, २०१२-२३८३, २०१३-३२२६, २०१४-१५०० संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली़ यापैकी २००९-३५, २०१०-४९, २०१११-६१, २०१२-४९, २०१३-५८, २०१४-१५ लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ जनजागृतीमुळे हे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते़