शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

नांदेड जिल्ह्यात भूजलपातळीत ३ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:31 IST

जिल्ह्यात यावर्षीच्या मोसमात सरासरीच्या ६० टक्के पर्जन्यवृष्टी झाली असली तरी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या जानेवारीअखेर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी चार तालुक्यांतील पाणीपातळीत २ ते ३ मीटरने घट झाल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे़ त्यामुळे यंदाचा उन्हाळा नांदेडकरांना जडच जाणार असल्याचे दिसून येत आहे़

गोविंद सरदेशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात यावर्षीच्या मोसमात सरासरीच्या ६० टक्के पर्जन्यवृष्टी झाली असली तरी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या जानेवारीअखेर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी चार तालुक्यांतील पाणीपातळीत २ ते ३ मीटरने घट झाल्याची चिंताजनक बाब उघडकीस आली आहे़ त्यामुळे यंदाचा उन्हाळा नांदेडकरांना जडच जाणार असल्याचे दिसून येत आहे़तर १० तालुक्यांतील पाणीपातळी १ ते २ मीटरने घटली असून दोन तालुक्यांच्या पाणीपातळीत अल्पशी घट झाली असल्याची माहिती जानेवारीअखेर केलेल्या सर्वेक्षण अहवालावरुन निदर्शनास आली आहे. वर्ष २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत सरासरी ५७०.२६ मि़मी. पर्जन्यमान झाले असून ते एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या ६० टक्के इतके आहे. दरम्यान, ज्या तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले. अशा तालुक्यांत आतापासूनच त्याचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे़जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये सप्टेंबरअखेर ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तर १० तालुक्यांमध्ये २० ते २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तसेच एका तालुक्यामध्ये पर्जन्यमानात १० ते २० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यातील फक्त मुदखेड तालुक्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.१३४ निरीक्षण विहिरींद्वारे भूजल पातळीची नोंदभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या वतीने १३४ निरीक्षण विहिरींद्वारे पाणलोटनिहाय भूजलपातळीची नोंद घेण्यात येते. त्या अनुषंगाने जानेवारीअखेरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील भूजल पातळीत मोठी घट झाल्याचे धक्कायदायक चित्र आहे.जिल्ह्यातील मुखेड, माहूर, देगलूर व धर्माबाद या चार तालुक्यांतील भूजल पातळीत सर्वात जास्त म्हणजे २ ते ३ मीटरने घट झाली आहे. तर नांदेड, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, लोहा, कंधार, बिलोली आणि मुदखेड तालुक्यातील पाणीपातळीत १ ते २ मीटरने घट झाली आहे. तर नायगाव व उमरी तालुक्यातील पाणीपातळीत अल्पशी घट झाली असल्याचे भूजल सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे़विशेष म्हणजे, किनवट व माहूर तालुक्यांत यावर्षीच्या मोसमात ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असल्यामुळे या दोन तालुक्यांतील वाडी-तांड्यावर जानेवारीपासूनच पाणीटंचाईसदृश्य स्थिती जाणवत आहे. उन्हाळा सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी, भूजल पातळीत झपाट्याने होत असलेली घट ही नक्कीच चिंताजनक आहे.येत्या काही दिवसांत भूजलपातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागात पुढील काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुढील दिवसांतील संभाव्य पाणीटंचाईचा धोका ओळखून उपाययोजना करणे गरजेचे आहे.यंदा विष्णूपुरीच्या वरच्या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे प्रकल्प तीन वेळेस शंभर टक्के भरला होता़ त्यामुळे दरवाजे उघडून अनेकवेळा पाणी सोडावे लागले़ यंदा शेतकºयांसाठीही पाणीपाळ्या सोडल्या़ उन्हाळ्यासाठी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे़